loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकण विकास प्रबोधिनी संस्थेच्या संचालिका, मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या सौ. कुमुदिनी रवींद्र चव्हाण यांना महाराष्ट्र स्टेट मास्टर गेम 2026 मध्ये रायफल शूटिंग गेम मध्ये गोल्ड मेडल

महाड [ प्रतिनिधी } कोकण विकास प्रबोधिनी संस्थेच्या संचालिका, मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या सौ. कुमुदिनी रवींद्र चव्हाण यांनी महाराष्ट्र स्टेट मास्टर गेम 2026 मध्ये रायफल शूटिंग गेम मध्ये गोल्ड मेडल मिळविले. सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. कुमुदिनी डुंबरे- चव्हाण, यांनी महाविद्यालयीन शिक्षण पुणे विद्यापीठातून घेतले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना क्रीडा क्षेत्रातील ॲथलेटिक चॅम्पियन म्हणून 1994/95 मध्ये एक मोठं नाव कमाविले. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतरचा प्रवास त्यांनी शिक्षण संस्थेकडे वळविला.कोकण विकास प्रबोधिनी या नावाचे संस्था त्यांनी स्थापन केली.. मॉडर्न इंग्लिश स्कूल रायगड जिल्ह्यातील नावारूपाला आलेली शाळा ही यांनी लावलेला एक छोटसं रोपटे. कुमुदिनी चव्हाण यांचा प्रवास क्रीडा आणि शिक्षण इथेच थांबला नाही तर त्यांनी 2024 मध्ये रायगडची लोकसभा लढविली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रायगडचे खासदार सुनीलजी तटकरे,माजी खासदार अनंत गीते यांच्या विरुद्ध लढणारी रायगड जिल्ह्यातील सावित्रीची लेक. वयाच्या पन्नाशीकडे झेपावत असताना. 21 व 22 नोव्हेंबर 2026 रोजी नाशिक येथे महाराष्ट्र स्टेट मास्टर गेम 2026 या स्पर्धेत कुमुदिनी चव्हाण यांनी भाग घेतला आणि रायफल शूटिंग या खेळात . गोल्ड मेडलला गवसणी घातली. कुमुदिनी चव्हाण म्हणतात वय महत्त्वाचं नसतं अंदाज आणि आत्मविश्वासबरोबर असेल तर निशाणा चूकत नाही.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg