loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकावून ठाण्यात हवेत फटाक्यांची आतषबाजी, ठाणे जिल्ह्यात विविध भागात अनेक गुन्हे दाखल

ठाणे (प्रतिनिधी) - दिवाळीत फटाक्यामुळे ठाणे जिल्ह्यात आगीचा वाढत्या घटना लक्षात घेता ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी रॉकेट आणि हवेत फटाके. उडविणाऱ्यावर बंदीचे आदेश दिले होते. तरी देखील जिल्हाधिकारी यांचे आदेश धुडकाविल्याच्या घटना घडल्या गेल्या तीन दिवसांत फटाके फोडणाऱ्यांविरोधात तब्बल १६२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रॉकेट आणि हवेत उडवून फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांवरील बंदी झुगारून त्यांचा वापर करणाऱ्यांविरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५१ (ब) अन्वयेही गुन्हे दाखल केले जात आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बंदी आदेशाचे उल्लंघन करून सार्वजनिक रस्त्यांवर रॉकेट आणि फटाके फोडणाऱ्या १० जणांविरोधात चितळसर, कापूरबावडी, कासारवडवली आणि वर्तकनगर पोलिसांनी कारवाई केली. ९ नोव्हेंबरच्या रात्रीपासून १० नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत ही कारवाई करण्यात आली. चितळसर पोलिसांनी पवारनगर येथील सिद्धाचल फेज सहा परिसरात रॉकेट फोडणाऱ्या पाच जणांवर कारवाई केली. याशिवाय कापूरबावडी पोलिसांनी माजीवडा येथील लोढा क्राउन परिसरात तिघांवर, कासारवडवली पोलिसांनी हिरानंदानी इस्टेट येथील रिजेन्सी बिझनेस पार्क परिसरात दोघांवर कारवाई केली. दुसरीकडे, वर्तकनगर पोलिसांनी उपवन तलाव परिसरात रॉकेट फोडणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला. असा तब्बल १६२ गुन्हे दाखल असल्याच्या घटना घडल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.

टाईम्स स्पेशल

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ९ नोव्हेंबरपासून ८ जानेवारी २०२७ पर्यंत सार्वजनिक व खासगी जागा, इमारतींच्या गच्च्या, बाल्कनी आणि रहिवासी परिसरात रॉकेट व तत्सम हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बंदी असतानाही रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांचा वापर करणाऱ्यांविरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदींनुसार स्वतंत्रपणे कारवाई करण्यात येत आहे. मात्र, गुन्हे दाखल होऊनही फटाक्यांची आतषबाजी थांबण्याची चिन्हे नाहीत. ठाण्यातील विविध भागांत रात्री उशिरापर्यंत फटाके फोडले जात असल्याचे चित्र आहे. विशेषतः मंगळवारी रात्रीही जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचे उल्लंघन करून अनेक ठिकाणी रॉकेट फटाके फोडण्यात आले. असल्याने नागरिकांचा बेजबाबदारपना समोर आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg