loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीचे ग्रामदैवत आई काळकाई देवीचा नवरात्रोत्सव

दापोली (दिपक साळवी) - दापोलीचे ग्रामदैवत आई काळकाईदेवीचा नवरात्रोत्सव मोठ्या भक्तीभावपूर्ण वातावरणात आणि पारंपारिक पद्धतीने सुरु आहे. काळकाई आईच्या देवळात पाषाण मूर्तीला रुपे लावण्यात आली आहेत. घटस्थापनेपासून काळकाईदेवीला आभूषणांनी सजविण्यात आले आहे. दसर्‍यापर्यंत विविध पूजा येथे संपन्न होत आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांनी आई काळकाई देवीच्या मंदिरात मोठा उत्साह संचारला आहे.ग्रामदैवत काळकाई देवीवर दापोलीकरांची मोठी श्रद्धा असून नवसाला पावणारी म्हणून आई ओळखली जाते. मुंबई, ठाणेहून भक्तगण हमखास आई काळकाई देवीच्या भेटीला येतात आणि देवीची ओटी भरुन आशिर्वाद घेतात आणि परतात. नवरात्र उत्सवानिमित्त आई काळकाईदेवीच्या मंदिरात भक्तीचा महापूरच आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg