loader
Breaking News
Breaking News
Foto

जलसंधारण अभियानांतर्गत बिजघर नंबर १. शाळेने बांधला वनराई बंधारा

खेड - यावर्षी शासनाने आपल्या राज्यामध्ये दुष्काळ घोषित केला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे गावागावात पाण्याची टंचाई भासू लागली आहे. त्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारण अभियान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येत आहे. या अंतर्गत खेड तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा बिजघर नं.१ शाळेने शिवपार्वती मंदिराशेजारी असलेल्या ओढ्यावर वनराई बंधारा बांधला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी बिजघर ग्रामपंचायत प्रशासक तथा तिसंगी केंद्राचे केंद्रप्रमुख महेंद्र जाधव, ग्राम पंचायत अधिकारी रमेश निकम व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे शाळेतील शिक्षक शैलेश पराडकर, संदीप घाणेकर, विजय सकपाळ व मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर व सर्व मुले उपस्थित होती. शाळेने ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्याने बंधारा बांधून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg