loader
Breaking News
Breaking News
Foto

पुनस हायस्कूलचे मुख्याध्यापक सुरेंद्र कल्लोळे यांची मुख्याध्यापक महामंडळाचा राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कारासाठी निवड

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल पुनसचे उपक्रमशील मुख्याध्यापक सुरेंद्र कल्लोळे यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक म्हणून पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याने त्यांचे तालुक्याभरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सुरेंद्र कल्लोळे यांची याअगोदर आशिया खंडातील सर्वात मोठी व महाराष्ट्रातील नामांकित अशा रयत शिक्षण संस्थेच्या समन्वय समितीमध्ये माध्यमिक शिक्षण विभागात मुख्याध्यापक प्रतिनिधी म्हणून निवड झाली असून हा मान प्रथमच रत्नागिरी जिल्ह्याला मिळाला होता. सुरेंद्र कल्लोळे यांच्या पुनस तसेच साखरपा येथील केलेल्या प्रामाणिक सेवेची आणि गुणवत्तेची दखल घेत तसेच पुनस सारख्या ग्रामीण भागात त्यांनी विनाअनुदानित काळात केलेली सेवा व गुणवत्ता वाढीसाठी राबविलेले नवनवीन उपक्रम यांची दखल घेत महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाने त्यांची गुणवंत मुख्याध्यापक म्हणून निवड करून विश्वास दर्शविला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल लांजा तालुक्यासह जिल्हाभरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg