loader
Breaking News
Breaking News
Foto

सामाजिक कार्याची दखल; प्रसाद गांधी यांना नॅशनल अवॉर्ड २०२६ प्रदान, तासगाव येथे बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडियाच्या वतीने सन्मान सोहळा

खेड, प्रतिनिधी : सामाजिक सेवा, रक्तदान जनजागृती, गरजू रुग्णांना मदत आणि अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या कार्याची दखल घेत मदत ग्रुप, खेडचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद दिलीप गांधी यांना बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडिया यांच्या वतीने आयोजित नॅशनल अवॉर्ड २०२६ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. शुक्रवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी तासगाव येथे हा सन्मान सोहळा पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाला बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडियाचे संस्थापक अध्यक्ष विक्रम विश्रांत यादव, स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप (आप्पा) कदम, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष तुकाराम धायगुडे, अभिजीत कौलगे, गणेश माने, पलूस तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चौगुले, वैभव यादव, अभिजीत बुधले, आसिफ आत्तार तसेच तासगाव तालुक्याचे DYSP किरण अवचर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

या सोहळ्यात प्रसाद गांधी यांचे गुरुवर्य आदरणीय विलास जाधव सर तसेच मदत ग्रुप, खेडचे सदस्य इंद्रकुमार रायका, अभिषेक डेरवणकर, समीर वानखेडे, विनायक कदम आणि अमोल सागवेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश राजमाने यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक संजय काळे यांनी, तर आभार आसिफ आत्तार यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg