loader
Breaking News
Breaking News
Foto

शिव बुद्रुक-भोईवाडी परिसरात रेल्वेच्या धडकेत ४२ वर्षीय कामगाराचा मृत्यू

खेड (प्रतिनिधी) - तालुक्यातील शिव बुद्रुक-भोईवाडी परिसरात रेल्वेच्या धडकेत ४२ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना २८ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. निलेश दत्ताराम लवंडे (वय ४२, रा. शिव बुद्रुक, भोईवाडी, ता. खेड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, २८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११.२५ वाजण्यापूर्वी खेडकडील रेल्वे मार्गावर मैल क्रमांक १०६/०७ च्या पुढील बाजूस, खेडपासून सुमारे ५० मीटर अंतरावर मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेगाडीची धडक बसल्याने निलेश लवंडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच त्यांच्या उजव्या पायाला मांडीपासून दुखापत होऊन शरीरावर लहान-मोठ्या जखमा झाल्या.

टाईम्स स्पेशल

या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची नोंद २९ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ३.३२ वाजता खेड येथे करण्यात आली आहे. याबाबत आकस्मिक मृत्यू क्रमांक ८९/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg