loader
Breaking News
Breaking News
Foto

विजघर चेकपोस्ट येथे गोवा बनावटीच्या दारूसह वाहन जप्त, ५ लाखाचा मुद्देमाल ताब्यात

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील चंदगड दोडामार्ग सीमेवर असलेल्या विजघर चेकपोस्ट येथून गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारी वाहने सोडली जातात. या गाडया चंदगड हद्दीत पकडल्या जातात याबाबत टाइम्समधून वृत्त प्रसिद्ध झाले होते. यानंतर वरिष्ठ अधिकारी यांनी विजघर चेकपोस्ट येथे वाहने तपासणी करा, असे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी एका वाहनांची तपासणी केली असता गोवा बनावटीची विविध प्रकारची जवळपास २५,८०० रुपये किमतीची दारू तसेच पाच लाख रुपये किंमतीचा टेम्पो असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमित चव्हाण, पोलीस साटेलकर यांनी ही कारवाई केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वीजघर चेकपोस्ट येथे ड्युटी दरम्यान वाहनाची तपासणी करत असताना १०.३० वा. गोवा ते बेळगांवकडे जाणारा तपकिरी रंगाचा आयशर टेम्पो गाडी नं जीए ०६ टी ६५१० थांबवला असता सदर आयशर टेम्पोची तपासणी करत असताना त्या गाडीच्या केबिनमध्ये बिगर परवाना गोवा बनावटी दारुने भरलेल्या कंपनी सिलबंद प्लॅस्टीकच्या व काचेच्या बाटल्या मिळुन आल्या. या प्रकरणी संशयित यासिन शफरुद्दीन शेख, वय ४२ वर्षे, रा. वाळकेश्वरवाडा बार्देश उत्तर गोवा यांना ताब्यात घेतले आहे. सदर कारवाईत् एकूण ५ लाख २५ हजार ८०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे करत आहेत. विजघर चेकपोस्ट येथून गोवा बनावटीची दारू वाहतूक होते हे पुन्हा एकदा कारवाई नंतर समोर आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg