दापोली (प्रतिनिधी) - सर्वसाधारणपणे संकष्टी चतुर्थी, विनायकी चतुर्थी किंवा अंगारकी चतुर्थीच्या दिवशी श्री गणपती मंदिरात भक्तगण भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. मात्र आज शनिवारी संकष्टी चतुर्थी नव्हती वा नव्हती विनायकी चतुर्थी किंवा अंगारकी चतुर्थीचा नव्हता योग तरी सुद्धा आंजर्ले येथील सुप्रसिध्द कडयावरील गणपती मंदिरात श्रींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. दापोली हे उत्तर कोकणातील महाबळेश्वर, अर्थात थंड हवेचे ठिकाण म्हणूनच दापोलीची ओळख आहे. अशा या तालूक्यात आंजर्ले नावाचे एक महसुली गाव कडयावरील श्रीं गणपती देवस्थानसाठी सुप्रसिद्ध असे ठिकाण आहे. आंजर्ले या गावाचे मूळ नाव पूर्वी अजरालय असे होते. सध्या मात्र आंजर्ले हेच नाव प्रचलित झाले आहे. त्याच आंजर्ल्याच्या एका टेकडीवर श्री गणपती विराजमान आहेत. त्याला सारे जण कड्यावरचा गणपती असेही म्हणतात.
अशा या श्री कडयावरील गणपती मंदिरातील श्री गणेशाच्या मूर्तीचे वर्णन शब्दांत करणे तसे कठीणच जाते. श्री गजाननाचे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला लाभणारी प्रसन्नता आणि शांती या दोन्ही गोष्टी केवळ अनुभवावयच्याच आहेत. गाभाऱ्यातील श्रींच्या मूर्तीवर विलक्षण तेज आढळते. पाच फूट उंचीची मूर्ती पूर्वाभिमुख असून शेजारील रिद्धि सिद्धिच्या मूर्ती सुमारे एक फूट उंचीच्या आहेत. हे मंदीर टेकडीवर असल्याकारणाने आपण दर्शनासाठी टेकडीवर येताच ते आपल्या दृष्टीस पडते. श्रीसिद्धिविनायकाचे मंदिर अर्थात कड्यावरचा गणपती अनेक भक्तांचे श्रद्धास्थान आहे. अशा या आंजर्ले येथील कडयावरील गणपती मंदिरात तसे कायमच भक्तगण हे दर्शनासाठी येत असले तरी विशेषतः संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी निमित्ताने खुपच मोठी दर्शनासाठी गर्दी होत असते.
तसे आज संकष्टी चतुर्थी नव्हती ना विनायकी वा नव्हती अंगारकी चतुर्थी तरी सुद्धा कोकण पर्यटनासाठी दापोलीत आलेल्या पर्यटकांनी कडयावरील श्रीं गणपती देवस्थानच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. शुक्रवारी २ ऑक्टोबर गांधी जयंती ३ ऑक्टोबर शनिवार आणि ४ ऑक्टोबर रविवार अशा सलग तीन सुट्ट्या जोडून आल्याने दापोली तालुक्यातील केळशी ते दाभोळ पर्यंतच्या किनारपट्टीवर मोठ्या संख्येने पर्यटक भटकंतीसाठी दाखल झाले आहेत. दापोली तालुक्यातील समुद्र किनारपट्टीवर भटकंती करिता आलेले पर्यटक हे आंजर्ले येथील कडयावरील गणपतींचे देव दर्शन ही घेत आहेत. त्यामुळे येथे दर्शनासाठी मोठीच गर्दी होत आहे. कड्यावरील श्री गणपती देवस्थान, आंजर्ले यांनी उत्तम व्यवस्था ठेवल्याने दर्शनासाठी येथे आलेल्या सर्व भाविक भक्तगणांना अगदी मनोभावे दर्शन घेता येते. हे या देवस्थान कमिटीच्या व्यवस्थापनाचे आणि येथील कर्मचारी, सेवेक-यांचे खरे यश म्हणावे लागेल.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.