loader
Breaking News
Breaking News
Foto

जमीर खलफे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : गेली अनेक वर्षे पत्रकारिता क्षेत्रात आपले योगदान देणारे रत्नागिरी शहरातील पत्रकार कोकणरत्न जमीर खलफे यांना वर्ल्ड फॉर नेचर इंडिया यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार 2026 जाहीर करण्यात आला आहे. जमीर खलफे यांना यापूर्वी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, कोकणरत्न ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जमीर खलफे हे पत्रकार असून त्यांचे सामाजिक कार्य मोठे आहे, रत्नागिरी येथे सामाजिक कार्य करणाऱ्या संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरीचे ते रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष असून या माध्यमातून ते सातत्याने सामाजिक विविध उपक्रम राबवित असतात. सैतवडे सोशल वेल्फेअर सोसायटीचे सचिव आहेत, मराठी पत्रकार परिषद रत्नागिरीचे ते सचिव असून ही महत्त्वाची जबाबदारी ते अतिशय प्रभावीपणे राबवित आहेत, त्यांना जाहीर झालेल्या या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल अनेक स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. सदर पुरस्कार सोहळा 22 नोव्हेंबर रोजी चिपळूण येथे मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg