loader
Breaking News
Breaking News
Foto

हर्षला नाईक यांनी मिळवली पीएचडी, करोना विषाणूच्या 'ऑप्टिकल बायोसेन्सींग' पध्दतीवर केले संशोधन

अलिबाग, (वार्ताहर) - अलिबाग तालुक्यातील परहुरपाडा गावच्या रहिवाशी असलेल्या हर्षला संदीप नाईक यांनी नुकतीच पीएचडी पूर्ण करून डॉक्टरेट मिळवली आहे. कोरोना विषाणूच्या ऑप्टिकल बायोसेन्सींग या विषयावर संशोधन करून प्रबंध लिहीला आहे. लहानपणापासून शिक्षणात हुशार असलेल्या हर्षला नाईक यांनी शास्त्र शाखेतून पदवी आणि पुढे पदव्युत्तर पदवी संपादन केली. वडिलांची आर्थिक परिस्थिती मध्यम असतानाही त्यांनी मुलीला शिक्षणासाठी प्रेरित केले. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतल्या नंतर माध्यमिक शिक्षण कोकण एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत घेतले.पुढे अलिबाग मधील जे.एस.एम. कॉलेज मध्ये बी. एस. सी ची पदवी घेतली. शिक्षणाची भूक इथेच थांबली नाही, तर पुढे जाऊन त्यांनी मॉलिक्युलर बायोलॉजी आणि सायटोजेनेटिक्स विषयात एम.एस्सी चे शिक्षण घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पि.एच्.डी. चे मनात कसे आले? याबाबत सांगताना डॉ.हर्षला नाईक म्हणाल्या की, पूर्वीपासून शिक्षणाची गोडी होतीच. बारावीला सायन्स घ्यायचे आणि शिक्षक व्हायचे हे अगोदरपासून ठरलेच होते. बी.एस्.सी.च्या फेअरवेलमध्ये (निरोप समारंभ) तसे सांगितले सुद्धा होते. त्यावेळी माझे शिक्षक डॉ. मिश्रा सर आणि प्रीती फाटे , मीनल पाटील यांनी ‘नेट-सेट’ (NET-SET) बद्दल माहिती दिली. पुढे एम.एस्सी.साठी ‘द इन्स्टिट्यूट ऑफ साइंस, मुंबई’ येथे प्रवेश घेतला आणि ‘नेट-सेट’बद्दल अजून माहिती मिळाली. नेट झाल्यानंतर कॉलेजमध्ये प्रोफेसरसाठी नवीन धोरणानुसार पीएचडी असणे बंधनकारक आहे, त्या अनुषंगाने पीएचडीसाठी ॲडमिशन घेतले. मुळातच माझी एम.एस्सी. बॉटनीमध्ये (वनस्पतिशास्त्र) झाल्यामुळे, कोविड विषाणूच्या संदर्भातील (SARS-CoV-2) घटकांवर काम करणे हे नविन होते. पण काहीतरी समाजाला चांगलं द्यावा या हेतूने या विषयाची निवड केली.

टाईम्स स्पेशल

प्रोफेसर डॉ. राजेश राऊत यांनी हर्षला नाईक यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विषय निवडण्यापासून ते प्रबंध कसा लिहायचा, यामध्ये त्यांची मदत प्रत्येक वेळी मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हे सर्व काम सोपे झाले. असे हर्षला यांनी सांगितले.तसेच ‘राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी’कडून प्रकल्प मंजूर करून आर्थिक सहाय्य मिळवून दिल्यामुळे त्यांची पीएचडी आणि प्रोजेक्ट दोन्हींचे काम पूर्ण झाले. पीएचडीच्या प्रवासात त्यांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. बॉटनीची पार्श्वभूमी असतानाही डॉ .राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना विषाणूच्या (SARS-CoV-2) स्पाइक अँटीजेन्सच्या तपासणीसाठी 'ऑप्टिकल बायोसेन्सिंग पद्धतीवर' संशोधन करणे हा एक समृद्ध अनुभव होता. या संशोधनादरम्यान आत्तापर्यंत ११ प्रबंध (Research Papers) आणि पुस्तकामध्ये ८ बुक चॅप्टर (Book Chapters) लिहिले आहेत. जरी हे संशोधन करणारी मी असले, तरी देवीकृपा आणि आई-वडिलांच्या पुण्याईशिवाय हे शक्य झाले नसते. अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg