loader
Breaking News
Breaking News
Foto

कुंवारबावच्या विकासाला नवी गती, रस्ते आणि पाणीप्रश्नावर महत्त्वपूर्ण निर्णय

रत्नागिरी - रत्नागिरीतील कुंवारबाव येथे सुमारे २५ लाख रुपये खर्चाच्या रस्त्याच्या बांधकामाचं आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. या निमित्तानं ना. उदय सामंत ह्यांनी ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी, पंचायत समिती सभापती प्रवीण पांचाळ, उपसभापती गजानन धनावडे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश रसाळ, प्रकाश शिंदे, अपर्णाताई कोकळकर, प्रल्हाद जाडगावकर यांच्यासह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गावातील आणखी दोन रस्त्यांसाठी येत्या दोन दिवसांत निधी मंजूर करण्याचा शब्द दिला. तसेच ग्रामस्थांनी सुमारे ६० वर्षांपूर्वीच्या नळपाणी योजनेतील पंपाच्या समस्येकडे लक्ष वेधलं. या कामासाठी आवश्यक निधी २४ तासांत मंजूर करण्याचा शब्द देत पाणीप्रश्न तातडीनं मार्गी लावण्यासंदर्भात त्यांना आश्वस्त केलं. अशा विकासकामांच्या निमित्तानं ग्रामस्थांच्या भेटीगाठी होतात, त्यांचे प्रश्न समजतात आणि त्यांच्या प्रेमातून व आशीर्वादातून काम करण्यासाठी नवी ऊर्जा मिळते, असे यावेळी ना. उदय सामंत म्हणाले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg