loader
Breaking News
Breaking News
Foto

पाचल बाजारपेठेत वानराचा हैदोस; विद्यार्थी, महिला, व्यापाऱ्यांमध्ये दहशत, वनविभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

पाचल (प्रतिनिधी) : पाचल बाजारपेठेत गेल्या महिना-दोन महिन्यांपासून एका वानराने अक्षरशः हैदोस घातला आहे. दुकानातील वस्तू पळविणे, हॉटेलमधील पदार्थ घेऊन जाणे, येणाऱ्या-जाणाऱ्यांवर हल्ला करणे, वाहनांसमोर अचानक उड्या मारणे, अशा प्रकारांमुळे व्यापारी, महिला, शालेय विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दोन दिवसांपूर्वी पाचल हायस्कूलमध्ये जाणाऱ्या एका विद्यार्थिनीला या वानराने जोरदार धडक दिल्याने ती रस्त्यावर पडली. तर सायकलवरून जाणाऱ्या एका नागरिकालाही पंजाने मारल्याने ते गंभीर जखमी झाले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, मात्र दररोज घडणाऱ्या अशा घटनांमुळे पालकांमध्येही चिंता वाढली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा वानर कोणालाही अजिबात घाबरत नाही. बाजारपेठेत मोकाटपणे फिरत असून, चालत्या वाहनांच्या पुढे अचानक येत असल्याने कधीही मोठा अपघात होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गंभीर प्रकाराची दखल घेऊन वनविभागाने आणि पोलीस यंत्रणेने तातडीने या वानराचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेश गुडेकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी रायपाटण पोलीस दूरक्षेत्र यांना माहिती दिली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg