रत्नागिरी : ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन दि. ३० नोव्हेंबर २०२६ रोजी लोकनेते शामराव पेजे सभागृह, जिल्हा परिषद रत्नागिरी येथे करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी व सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ भास्कर जगताप, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ माधव ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळेचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. राज्यस्तरावरून ए.बी.टी.एस स्वयंसेवी संस्थेचे राजू गुत्ते तसेच कोल्हापूर परिमंडळाच्या पीएमयु प्रीती साबळे व सूरज कांबळे यांनी प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या प्रास्ताविकात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियान शासन निर्णयानुसार विविध निर्देशंकांची माहिती देऊन जिल्ह्यातील सर्व विभागांनी समन्वयाने काम करून उपलब्ध असलेल्या विविध आरोग्य योजना व आरोग्यसेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवाव्यात. गावातील सर्व घटकांचा सहभाग नोंदवून आरोग्यविषयक सुधारणा करण्याबरोबरच अभियानाशी संबंधित रेकॉर्ड कीपिंग व दस्तऐवजीकरण व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके यांनी पंचायत समिती स्तरावर व ग्रामपंचायत स्तरावरही अशा प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करून अभियानाबाबत व्यापक जनजागृती व कृती आराखडा तयार करणे आवश्यक असल्याचे सांगितले. परिसर स्वच्छता, स्वच्छ पाणी, कुपोषित बालकांचे आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर विशेष लक्ष देऊन सर्व विभागांच्या समन्वयातून काम केल्यास रत्नागिरी जिल्हा निश्चितपणे आरोग्यसंपन्न जिल्हा होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रत्येक विभागाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांनी अधिक समन्वयाने काम केल्यास अभियानाचा परिणाम अधिक प्रभावी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.‘आरोग्यसंपन्न शरीरात निरोगी मन वास करते’ या विचारानुसार समाजातील सर्व घटकांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बळकट करण्यावर भर देणे आवश्यक आहे. कुपोषित बालकांचे आरोग्य, किशोरवयीन मुला-मुलींचे आरोग्य, असंसर्गजन्य आजारांचे प्रभावी व्यवस्थापन, एचपीव्ही लसीकरण तसेच विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष देऊन ग्रामपंचायत स्तरावर सर्व विभागांनी समन्वय साधून एकत्रितपणे काम केल्यास आरोग्यसंपन्न गावाचे उद्दिष्ट साध्य करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्षीय भाषणात जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियान केवळ अभियानाच्या कालावधीपुरते मर्यादित न ठेवता प्रत्येकाने सकारात्मक व आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे सांगितले. या कार्यशाळेस जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती व सदस्य, सरपंच, गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, समुदाय आरोग्य अधिकारी, आशा गटप्रवर्तक, आरोग्य सेवक सेविका यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.