loader
Breaking News
Breaking News
Foto

दिवाळीनिमित्त बांदा श्रीराम चौकात सिंधुदुर्ग किल्ल्याची भव्य प्रतिकृती

बांदा (प्रतिनिधी) - बांदा येथे श्री राम चौक येथे दिवाळी निमित्त सिंधुदुर्ग किल्ल्याची भव्य प्रतिमा उभारण्यात आलेली आहे. स्वराज्याच्या आरमाराचा अभेद्य जलदुर्ग म्हणून ज्याची ओळख आहे असा सिंधुदुर्ग किल्ला बांद्यात उभारला आहे. याठिकाणी इतिहास प्रेमी, शिवभक्त, नागरिक मोठ्या संख्येने भेट देत आहे. उंच तटबंदी, शिवरायांची मूर्ती, मावळ्यांच्या प्रतिमा आणि आकर्षक सजावट यांचा सुंदर संगम या किल्यामध्ये साधण्यात आला आहे. ही कलाकृती श्री शिवप्रतिष्ठान ग्रुप निमजगा यांनी साकारली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यासाठी गिरीश भोगले, रघुनाथ सावंत, बाळा बहिरे, भाई म्हाडागुत, सर्वेश नाईक, समील नाईक, सुहास सावंत यांनी विशेष मेहनत घेतली.तसेच सुरज राऊळ, निलेश सावंत, सुभाष शिरोडकर यांच यासाठी विशेष सहकार्य लाभले. इतिहासतज्ञ्चे मार्गदर्शन आणि हिंदू विचार मंचचे सहकार्य यामुळे दरवर्षी गडउभारणीसाठी नवनवीन कल्पकता साध्य होते, असे दुर्गमावळा प्रतिष्ठान चे सदस्य समील नाईक यांनी सांगितले

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg