loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात मुंब्रा रेतीबंदर रोडवर कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील दोघा तरुणांचा मृत्यू

ठाणे (प्रतिनिधी) - मुंब्रा येथून ठाण्याकडे येणाऱ्या अशोक लेलँड कंपनीच्या कंटेनरची मुंब्रा रेतीबंदर रोडवर दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुण कंटेनरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे मुंब्रा-ठाणे रोडवरील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. या अपघातात १) अरिस अस्लम कुरेशी. (१८) राहणार - जावेद कॉम्प्लेक्स, देवरी पाडा, मुंब्रा, ठाणे. २) इरफान अहमद अन्सारी. (१८) राहणार - सहारा चाळ, रजा मस्जिद जवळ, देवरी पाडा, मुंब्रा, ठाणे.) या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ११ - ४० वाजण्याच्या सुमारास अपघात झाल्याची घटना घडली. सदर अपघात घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी कंटेनरच्या खाली अडकलेल्या व्यक्तींची सुटका करून त्यांना पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये रुग्णवाहिकेमधून उपचाराकरिता कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज कळवा रुग्णालय येथे दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी दोघांना मृत घोषित केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg