loader
Breaking News
Breaking News
Foto

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरणाची सीआयडी चौकशी करुन कारवाई करा, अन्यथा महामार्ग रोको होईल - बाळा खेडेकर

खेड (प्रतिनिधी) : खेड शहरातील जिजामाता उद्यान येथे एप्रिल २०१८ मध्ये घडलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणाची तातडीने निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघ - महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळा खेडेकर यांनी उपविभागीय अधिकारी खेड यांच्या मार्फत हे निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. अशा महामानवाच्या पुतळ्याची विटंबना होणे ही सामाजिक अस्मितेला धक्का देणारी गंभीर घटना आहे. एप्रिल २०१८ मध्ये खेड येथे ही घटना घडल्यानंतर पाच ते दहा हजार नागरिक रस्त्यावर उतरले होते. तत्कालीन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील खेडला भेट देऊन सीआयडी चौकशीची मागणी केली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यावेळी प्रशासनाने सीआयडी चौकशीचे आश्वासन दिल्याने आंदोलन शांत झाले होते. मात्र अनेक वर्षे उलटूनही चौकशी झाली की नाही, दोषींवर कारवाई झाली की नाही, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जनतेसमोर आलेली नाही. हा शासनावर विश्वास ठेवणार्‍या हजारो नागरिकांच्या विश्वासाचा प्रश्न आहे. या आहेत प्रमुख मागण्या - १. या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन सीआयडी चौकशी आदेशाची अधिकृत माहिती जाहीर करावी. २. चौकशी पूर्ण झाली असेल तर अहवाल आणि केलेल्या कारवाईची माहिती द्यावी. ३. चौकशी झाली नसेल तर वरिष्ठ अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली निष्पक्ष चौकशीचे आदेश द्यावेत. ४. दोषींवर कोणताही राजकीय दबाव न ठेवता कठोर कायदेशीर कारवाई करावी. ५. तपासात कसूर करणार्‍या अधिकार्‍यांवरही कारवाई करावी. ६. १४ एप्रिल २०२७ रोजी होणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३६ व्या जयंतीपूर्वी संपूर्ण चौकशी पूर्ण करून अधिकृत अहवाल जाहीर करावा.

टाईम्स स्पेशल

१४ एप्रिल २०२७ पूर्वी न्याय मिळाला नाही, तर खेड तालुक्यातील बौद्ध समाज, आंबेडकर अनुयायी आणि सामाजिक संघटनांना सोबत घेऊन मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर लोकशाही व शांततामय मार्गाने रास्ता रोको जनआंदोलन छेडण्यात येईल, असा अंतिम इशारा बाळा खेडेकर यांनी दिला आहे. आंदोलनादरम्यान रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांना अडथळा होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही निवेदनात नमूद केले आहे. हे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री, पोलीस महासंचालक, अपर पोलीस महासंचालक (सीआयडी), जिल्हाधिकारी रत्नागिरी, पोलीस अधीक्षक रत्नागिरी, मुख्याधिकारी खेड नगरपरिषद आणि खेड पोलीस ठाणे यांना माहितीसाठी पाठवण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg