loader
Breaking News
Breaking News
Foto

वैशाली हेगिष्ट्ये हत्येच्या घटनेसह परिसरातील इतर घटनांचाही सखोल तपास करा; वेरवली खुर्द ग्रामस्थांची मागणी

लांजा (संजय साळवी) - तालुक्यातील वेरवली बुद्रुक रामगाव लाडवाडी येथील वैशाली हेगिष्ट्ये हत्येच्या घटनेसह परिसरात घडलेल्या इतर घटनांचाही सखोल तपास करण्यात यावा अशी मागणी वेरवली खुर्द गावच्या ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांना शुक्रवारी ३० ऑक्टोबर रोजी देण्यात आले. तालुक्यातील वेरवली खुर्द गावच्या ग्रामस्थांनी लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वेरवली बुद्रुक रामगाव लाडवाडी येथे दि. १९ ऑक्टोबर रोजी वैशाली विलास हेगिष्ट्ये यांच्या निर्घृण हत्येची घटना घडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घटनेतील आरोपी हा परिसरातील असल्याचे तपासाअंती उघडकीस आले आहे. या हत्येच्या घटनेने वेरवली बुद्रुक व वेरवली खुर्द गाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या हत्येच्या घटनेआधी काही महिने व वर्षांपूर्वी या परिसरात चोरी व अन्य घटना घडलेल्या आहेत. यामध्ये वेरवली खुर्द - कातळवाडी येथील मारुती नाना साळसकर यांच्या राहत्या घरातून सोन्याची चोरी, वेरवली खुर्द येथील दिनकर बाणे यांची पत्नी सरीता दिनकर बाणे यांची अज्ञात दुचाकी स्वाराने भरदिवसा मंगळसूत्र चोरी, वेरवली खुर्द येथील ग्रामदैवत मंदिरातील घंटा चोरी, वेरवली खुर्द आगरवाडी येथील गणपती मंदिर मधील दानपेटी फोडी यासह वेरवली खुर्द येथील विजय खेडेकर यांच्या बंद घरातील वस्तूंची चोरीच्या घटना घडल्या आहेत. या सर्व घटना व हत्येच्या प्रकरणांचा सखोल तपास करुन संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वेरवली खुर्द गावच्या ग्रामस्थांनी या निवेदनात केली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg