loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडशीत ग्रामस्थ आणि भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने वनराई बंधारा पूर्ण

रत्नागिरी - वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेषण आणि विकास यंत्रणा (GSDA) रत्नागिरी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामपंचायत खेडशी येथील सरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांच्या संयुक्त सहभागाने भंडारवाडी (खेडशी) येथील ओढ्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. या ओढ्यातून वाहून जाणारे पाणी वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून अडवले गेल्याने शेजारील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होईल तसेच या ओढ्या वर असणाऱ्या भूजलावर आधारीत उद्भवास देखील याचा फायदा होणार आहे. या वनराई बंधाऱ्या मुळे उन्हाळ्यातील पाणी पातळी टिकून राहण्यास मदत होईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पाणी टंचाई वर मात करण्यासाठी नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाचा योग्य वापर करून भुजल पुनर्भरण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. या कामासाठी स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ व ग्रामसेवक यांचे सहकार्य लाभले. या वनराई बंधाऱ्यामुळे परिसरातील पाणी टंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होणार असल्याने ग्रामस्थाकडून वनराई बंधारा बांधल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg