संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील कोंड्ये परिसरात बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवार, दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री दोन वेगवेगळ्या गोठ्यांमध्ये बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात एका गाईचा पाडा गंभीर जखमी झाला असून, दुसर्या गोठ्यातील म्हशींवरही बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. शिवसेना विभाग प्रमुख महेश देसाई यांनी या संदर्भात माहिती दिली..रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास मंगेश सुरेश बोमे यांच्या गोठ्यातून म्हशींच्या मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज आला. सुरुवातीला मंगेश बोमे यांना नेमके काय घडले याचा अंदाज आला नाही. मात्र, गोठ्यात काहीतरी हालचाल सुरू असल्याचे त्यांचे वडील सुरेश बोमे यांनी सांगितल्यानंतर दोघेही लाईट घेऊन गोठ्याच्या दिशेने धावले. त्यावेळी गोठ्यातून बिबट्याने दुसर्या बाजूने उडी मारून पळ काढला. या घटनेत एका म्हशीला बिबट्याच्या नखांचा ओरखडा लागल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे गोठ्यातील जनावरे प्रचंड घाबरली होती.
या घटनेनंतर अवघ्या एका तासात, म्हणजेच रात्री तीन वाजण्याच्या सुमारास शेजारीच असलेल्या आत्माराम गंगाराम बोमे यांच्या गोठ्यातूनही जनावरांच्या ओरडण्याचा मोठा आवाज आला. आवाज ऐकताच मंगेश बोमे यांच्यासह परिसरातील नागरिक आणि आत्माराम बोमे यांनी गोठ्याकडे धाव घेतली. त्यावेळी बिबट्याने गाईच्या पाड्याच्या गळ्याला पकडल्याचे दिसून आले. नागरिकांचा गोंगाट आणि आरडाओरड ऐकताच बिबट्याने तेथून पळ काढला. मात्र, या हल्ल्यात गाईचा पाडा गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच कोंड्ये परिसरातील सुवरेवाडी येथे धोंडू सुवरे यांच्या पत्नीवरही बिबट्याने झडप घालून त्यांना जखमी केले होते. सलग घडणार्या या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एकीकडे बिबट्याचे हल्ले वाढत असताना दुसरीकडे वन विभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप कोंड्ये ग्रामस्थांनी केला आहे.
यापूर्वी महिलेवर हल्ला होऊनही नुकसानभरपाई आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांसह पाळीव जनावरांच्याही जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वन विभागाने या घटनांची तातडीने दखल घ्यावी, परिसरात गस्त वाढवावी, बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच नुकसानग्रस्तांना नियमानुसार भरपाई द्यावी, अशी मागणी कोंड्ये ग्रामस्थांकडून होत आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.