loader
Breaking News
Breaking News
Foto

आंजणारी पूल येथे कोळसा घेवून जाणारा ट्रक पलटी होवून अपघात

लांजा (वार्ताहर) - मुंबई - गोवा महामार्गावरील आंजणारी पूल येथे अपघाताची मालिका सुरूच असून गोव्याच्या दिशेने कोळसा घेऊन जाणारा आयशर ट्रक पलटी होऊन अपघात झाल्याची घटना बुधवारी २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त आयशर ट्रक (क्र. जीजे १२ बीवाय ३५५८) हा गोव्याच्या दिशेने कोळसा घेऊन जात असताना मुंबई - गोवा महामार्गावरील आंजणारी घाटातील तीव्र उताराच्या आंजणारी पूल येथे सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास पलटी झाला. या अपघातामध्ये ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने चालक बचावला आहे. या अपघातामध्ये तो किरकोळ जखमी झाला.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी याठिकाणी मच्छी वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला होता. बुधवारी पुन्हा या ठिकाणी अपघात झाल्याने आंजणारी पूल येथे अपघाताची मालिका सुरूच असून याठिकाणाचे अपघात रोखण्यास महामार्ग विभाग अपयशी ठरला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg