मालवण (प्रतिनिधी) - सात वर्षांपूर्वी मालवण गवंडीवाडा येथील डॉमनिक फिलिप ब्रिटो यांच्याकडून व्यवसाय व कंपनीच्या कामासाठी टप्प्या टप्प्याने तब्बल २६ लाख रुपये घेऊन हि रक्कम परत करताना दिलेला २६ लाख रुपयांचा धनादेश खात्यात रक्कम नसल्याने बाउंस झाल्याने धनादेश अनादर प्रकरणी तसेच पैसे घेतलेच नसल्याचा बनाव केल्याप्रकरणी आरोपी किस्तू इजाक फर्नांडिस (रा. दांडी, मालवण) याला मालवण न्यायालयाने सहा महिने करावास व रु. ३६ लाख एवढ्या द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे. फिर्यादी डॉमनिक फिलिप ब्रिटो यांच्यावतीने ऍड. सतीशकुमार धामापूरकर यांनी काम पाहिले.
दांडी येथील किस्तू इजाक फर्नांडिस याने व्यवसाय व कंपनीच्या कामासाठी मालवण गवंडीवाडा येथील डॉमनिक फिलिप ब्रिटो यांच्याकडून १८ जानेवारी २०१९ ते २१ नोव्हेंबर २०१९ या काळात टप्प्याटप्प्याने २६ लाख रुपये एवढी रक्कम घेतली होती. आपली त्रिमूर्ती माईन्स अँड मिनरल्स कंपनी असून सदर कंपनीने लोहखनिज परदेशीं विकल्याने परदेशातून आलेली रक्कम आपल्या खात्यात जमा असून ती रक्मम मिळण्यासाठी १९ लाख ९५ हजार रुपये भरावे लागतील, त्यानंतरच खात्यात जमा झालेली रु. १३ कोटी रक्कम आपणास मिळेल व त्यातून आपण २६ लाख परत करू, असे किस्तू फर्नांडिस याने डॉमनिक ब्रिटो यांना सांगितले होते. त्यानंतर किस्तू फर्नांडिस याने १३ कोटी खात्यात जमा झाल्याचा मोबाईल मॅसेज ब्रिटो यांना दाखवत रक्कम परत फेडीसाठी २६ लाख रुपयांचा धनादेश ३० जानेवारी २०२० रोजी दिला होता. मात्र हा धनादेश बँक खात्यात जमा केला असता किस्तू फर्नांडिस याच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने धनादेशाचा अनादर झाला. या विरोधात डॉमनिक ब्रिटो यांनी न्यायालयात केस दाखल केली. यानंतर आरोपी किस्तू फर्नांडिस याने आपण पैसे घेतलेच नाही, धनादेशावरील सही आपली नाही, धनादेश आपल्या खात्याचा नाही तसेच फिर्यादीने दिलेल्या पत्त्यावर आपण राहतच नाही असा बचाव केला.
मात्र फिर्यादी ब्रिटो यांनी आरोपीस रक्कम दिली होती त्या त्या वेळी त्याचेकडे पूरेशी रक्कम होती तसेच बऱ्याच वेळा सदरच्या रक्कमा त्याने ज्या खात्याचा चेक दिला होता त्यामध्ये आपण दिलेल्या चेकने जमा झाल्या होत्या. तसेच आरोपीची सही जुळत नाही म्हणून चेक वटला नाही अशी वस्तुस्थिती नव्हती, असे स्पष्ट केले. तसेच आरोपीचा नोटीसीत नमूद पत्ता हा त्याचे आधारकार्ड व मतदार यादीत आहे, असे न्यायालयात दाखवून दिले. त्यामूळे दिवाणी न्यायाधीश एम. के. फकीह यांनी आरोपीस ६ महिन्यांच्या कारावासाची व रक्कम रु. ३६ लाख एवढ्या द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली. तसेच सदरचा द्रव्यदंड आरोपीने फिर्यादीस २ महिन्याचे आत द्यावा त्यात कसूर केल्यास आरोपीस आणखी ६ महिन्यांची कैदेची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपीने फिर्यादीस सदर फिर्यादीचे कामी झालेला खर्च म्हणून रक्कम रु. ७० हजार एवढी रक्कम द्यावी व सदरची रक्कम न दिल्यास आणखी २० दिवसांचा कारावास भोगावा अशी शिक्षा दिली आहे. फिर्यादी डॉमनिक ब्रिटो यांचेतर्फे अॅड. सतिशकुमार विश्राम धामापूरकर यांनी काम पाहीले.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.