loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी शहरातील विविध भागांतील युवकांचा युवा सेनेत जाहीर प्रवेश

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील विविध भागांतील युवकांनी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत युवा सेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे शहरातील युवा सेनेच्या संघटनात्मक बळात वाढ झाली आहे. शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील गौरव शिंदे यांच्या समवेत अनंत बसणकर, किरण खेडेकर, सुमित घोसाळकर, ऋषिकेश रसाळ आणि सूरज भोसले यांनी युवा सेनेत प्रवेश केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच मानस गुरव यांच्या समवेत मानस शिवलकर, ऋग्वेद महाकाळ, रेहान बलबले, सचिन बेहेरे, यतीन नेवरेकर, आर्यन मसाये, आदित्य पवार आणि अहमद मुरादअली पाटणकर* यांनी पक्षात प्रवेश केला. याशिवाय अहमद मुरादअली पाटणकर यांच्या समवेत अफराज मुकादम, अरसलान हुनेरकर, रिजवान सनादी आणि एम. डी. सकलेन, तर श्रवण शिंदे यांच्या समवेत चिराग राठोड, श्रेयस मेस्त्री, ऋषिकेश रसाळ, अवधूत गवंडी आणि यज्ञेश चव्हाण आदी युवकांनी युवा सेनेत प्रवेश केला.

टाईम्स स्पेशल

हा पक्षप्रवेश शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, उपशहर प्रमुख विकास पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख तुषार साळवी, युवासेना तालुकाप्रमुख हर्षराज पाटील तसेच नगरसेवक व युवासेना शहरप्रमुख अभिजित दुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रथमेश साळवी, रोहित मायनाक, सर्वेश शेलार, दुर्वेश पांगम, शुभम साळवी, रितेश साळवी आदी उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे रत्नागिरी शहरात युवा सेनेच्या संघटनात्मक विस्ताराला चालना मिळणार असून, युवकांचा सहभाग वाढण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा उपक्रम ठरला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg