loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूण नगरपरिषदेचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवातील विजेत्यांचा दिमाखदार गौरव सोहळा

चिपळूण (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान ७.० आणि सेवा संकल्प अभियानांतर्गत चिपळूण नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा सोमवारी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. माझी वसुंधरा अभियान ४.० आणि ५.० मध्ये सलग दोन वर्षे कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या चिपळूण नगरपरिषदेने पर्यावरण रक्षणाचा वसा यंदाही कायम ठेवला आहे. नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपनगराध्यक्षा डॉ. रुपाली दांडेकर यांनी, "आपण आणि पर्यावरण वेगळे नाही, निसर्गाचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे," असे सांगितले. तर भाजप गटनेते शशिकांत मोदी यांनी भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येकाने थेंब थेंब पाणी वाचवावे, असे आवाहन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी शिवसेना गटनेते अंकुश आवले, सभापती नीलम जाधव, रसिका देवळेकर, राणी महाडिक, कपिल शिर्के, नगरसेविका अंजली कदम, वैशाली कदम, नगरसेवक संजय गोताड, गणेश आग्रे, मुख्याधिकारी संजय जाधव, परीक्षक संतोष केतकर, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, मंगेश पेढांबरकर यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शाहीद खेरटकर यांनी केले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे - १) घरगुती पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा - प्रथम क्रमांक - ओंकार मुकुंद काणे, द्वितीय - विपुल गोगटे, तृतीय - साहिल ठाकरे, उत्तेजनार्थ - विशाखा चितळे व अक्षय कुडाळकर. २) शाडू माती मूर्तीकार स्पर्धा - प्रथम - विनायक आंबेडकर (ओम कला केंद्र, खेंड), द्वितीय - विजय सागवेकर (शंकरवाडी), तृतीय - राजेंद्र माजलेकर (यशवंत आर्टस्, खेंड). या मूर्तीकारांना रोख रक्कम, शाल, शिल्ड व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. ३) शालेय वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा - परांजपे मोतीवाले हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, सुरेश गडरे इंग्लिश स्कूल, युनायटेड इंग्लिश स्कूल, शाळा पाग व जि. प. शाळा ओझरवाडी येथील विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल नगरपरिषदेचे उद्यान विभाग प्रमुख प्रसाद उर्फ बापू साडविलकर यांचे मार्फत सेवा तत्वावरील उद्यान तांत्रिक कार्यकारी सुरज सकपाळ. सेवा तत्वावरील डेटा ऑपरेटर सायली खेतले, शरद पवार, मनस्वी शिंदे, सेजल महाडीक, गार्डन कर्मचारी कुशल गमरे, सुरज जाधव, रसिक खेडेकर, संजय म्हादे, आदित्य कांबळे, लहू बने, यांचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. चिपळूणचा पर्यावरणाचा लौकिक असाच कायम राखण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg