loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण तालुक्यातील २०५ नोंदीत घरेलू कामगारांना भांडी संचाचे वाटप; भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्गच्या पाठपुराव्याला यश

मालवण (प्रतिनिधी) - भारतीय मजदूर संघ, सिंधुदुर्ग तर्फे ३१ जुलै २०२४ पूर्वी नोंदणीकृत असलेल्या मालवण तालुक्यातील २०५ घरेलु कामगारांना संसार उपयोगी भांडी संच वाटप मामा वरेरकर नाट्यगृहात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व मालवणच्या नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या भांडी संचासाठी भारतीय मजदूर संघाने केलेल्या पाठपुराव्यामुळे घरेलू कामगारांना भांडी संच प्राप्त झाले असून दिवाळी सणात हे संसारपयोगी भांडी संच प्राप्त झाल्याने कामगारांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपगराध्यक्ष दीपक पाटकर, भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि बांधकाम कामगार महासंघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हरी चव्हाण, नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, नगरसेविका शर्वरी पाटकर, मेघा सावंत, नगरसेवक ललित चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहराध्यक्ष राजु बिडये, भारतीय मजदूर संघ जिल्हा सचिव हेमंतकुमार परब, सहसचिव शुभांगी सावंत, जिल्हा उपाध्यक्ष सीमा धुरी, निनाद बादेकर, शुभम लुडबे आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी हरी चव्हाण म्हणाले, शासन आदेश २०२४ नुसार महाराष्ट्रातील पात्र नोंदणीकृत घरेलू कामगारांना लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी भांडी संच वाटप करण्यात आले होते. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र ९१६ घरेलू कामगार या संसार उपयोगी भांडी संचापासून वंचित राहिले. याबाबत भारतीय मजदूर संघाने शासन पातळीवर कामगार मंत्री आकाश फुंडकर, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे तसेच आमदार निलेश राणे यांच्यामार्फत पाठपुरावा केला, या पाठपुराव्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडी संच मंजूर करून घेण्यास यश मिळाले आहे असे चव्हाण यांनी सांगत पालकमंत्री व आमदार यांचे आभार मानले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही घरेलू कामगारांना ६० वर्षे पूर्ण झाल्याच्या तांत्रिक अटीमुळे अनेक वृद्ध कामगार या लाभापासून वंचित राहिले आहेत. हे वाटप मूळ आदेशानुसार २०२४ मध्येच होणे अपेक्षित होते. कामगार विभागाच्या विलंबामुळे ६० वर्ष पूर्ण झालेले कामगार वंचित राहिले आहेत. तरी वयोमर्यादेची अट शिथिल करून ६० वर्षे पूर्ण झालेल्या कामगारांनाही हा लाभ मिळवून द्यावा. तसेच वय वर्षे ५५ वरील नोंदणीकृत घरेलू कामगारांना आर्थिक आधार देण्यासाठी रु. १०,०००/- सन्मानधन थेट बँक खात्यात जमा केले जाते. यानुसार डिसेंबर २०२५ अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २६१ कामगार या लाभासाठी पात्र ठरत आहेत. मात्र, जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयाला अद्याप यासाठीचा निधी प्राप्त झालेला नाही. तरी सदर निधी शासनाकडून तातडीने मंजूर करून घेण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्याकडून प्रयत्न व्हावेत, असे यावेळी हरी चव्हाण यांनी सांगत आमदारांकडे मागणी केलेल्या या मागण्यांचे निवेदन दत्ता सामंत यांना सादर केले. तसेच सदर मागण्या शासनाकडून पूर्ण न झाल्यास आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही, असेही हरी चव्हाण यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

यावेळी दत्ता सामंत म्हणाले, असंघटित कामगारांना कामगारांना न्याय देण्यासाठी हरी चव्हाण व भारतीय मजदूर संघ सातत्याने काम करत आहेत. या असंघटित क्षेत्रातील घरेलू कामगारांना सामाजिक सुरक्षा व त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्यामार्फत न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू तसेच याबाबत आमदार निलेश राणे यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल, अधिवेशनातही आमदार प्रश्न मांडतील, जे कामगार लाभापासून वंचित राहिले त्यांना न्याय देण्यासाठी सरकारला भाग पाडू, असेही दत्ता सामंत म्हणाले. यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर यांनीही विचार मांडत भारतीय मजदूर संघाच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते घरेलू कामगारांना भांडी संचाचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन हेमंतकुमार परब यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg