loader
Breaking News
Breaking News
Foto

तायक्वांदो स्पर्धेत आय.सी.एस. महाविद्यालयाची दोन कास्यपदकांची कमाई

खेड : मुंबई विद्यापीठाच्या आंतरविभागीय तायक्वांदो स्पर्धेत सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत दोन कास्यपदकांवर आपले नाव कोरले. या स्पर्धेत सूरज गमरे आणि फातिमा देशमुख यांनी कास्यपदक पटकावत महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशात मानाची भर घातली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबई विद्यापीठाच्या आंतरविभागीय तायक्वांदो स्पर्धांचे आयोजन रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेत आय.सी.एस. महाविद्यालयाच्या कु. सूरज गमरे याने आपल्या गटात उत्कृष्ट कामगिरी करत कास्यपदक मिळवले. तसेच फातिमा देशमुख हिनेही प्रभावी खेळाचे प्रदर्शन करत कास्यपदक पटकावले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी भर पडली आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणि जिद्दीला मिळालेले हे यश महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे.

टाईम्स स्पेशल

या यशाबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. उपेंद्र तलाठी, कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला, संस्थेचे विश्वस्त व महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन अॅड. आनंदराव भोसले, महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. अनिता आवटी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी दोन्ही पदकविजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg