loader
Breaking News
Breaking News
Foto

साडेचारशे वर्षाची गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या ओटवणे गावचा प्रसिद्ध शाही दसरोत्सव उत्साहात

सावंतवाडी : साडेचारशे वर्षाची गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या ओटवणे गावचा प्रसिद्ध शाही दसरोत्सव उत्साहात संपन्न झाला. भाविकांनी सोने म्हणून आपट्याची पाने लुटली. यावेळी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्यासह हजारो भाविकांची उपस्थिती होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खंडेनवमी आणि विजयादशमी असे दोन दिवस साजरा होणाऱ्या या दसरोत्सवात वर्षातून एकदाच पहायला मिळणाऱ्या सुवर्णतरंगांच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह गोवा, बेळगाव, कोल्हापूर परिसरातून भाविकांनी अलोट गर्दी केली होती. आज रवळनाथासह देवस्थानच्या देवतांना भरजरी वस्त्रांसह सुवर्णालंकारांनी सजविल्यानंतर तिन्ही तरंगांना सप्त पितांबरीच्या वस्त्रांनी सजविण्यात आले. सायंकाळी सुवर्ण तरंगासह सवाद्य पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर शिवलग्न सोहळा पार पडला. याच दरम्यान भाविकांनी सोने म्हणून आपट्याची पाने लुटली. यानंतर तिन्ही तरंग देवतांच्या साक्षीने महिलांचे इंगळे स्नान संपन्न झाले.

टाईम्स स्पेशल

यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर म्हणाले, हा दसरोत्सव सावंतवाडी संस्थानची परंपरा असून गावकऱ्यांनी ही परंपरा जपली आहे. या शाही परंपरेचा सार्थ अभिमान सावंतवाडीकरांना आहे अस मत व्यक्त केले. उद्या, मंगळवारी सायंकाळी सुवर्ण तरंगाची खेम सावंत समाधी भेट व गाव रखवाल कौलाने या दोन दिवसांच्या दसरोत्सवाची सांगता होणार आहे. या राजेशाही उत्सवात मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी होत देवस्थानचं सुवर्ण वैभव 'याची देही याची डोळा' पाहिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg