loader
Breaking News
Breaking News
Foto

'हिरकणी महोत्सवाचा' आज शेवटचा दिवस! खरेदीची अंतिम संधी आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नवी मुंबईकरांची लगबग

नवी मुंबई, : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेरूळ येथील प्रदर्शन मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य 'हिरकणी महोत्सवाचा' आज (४ नोव्हेंबर) अंतिम दिवस आहे. गेल्या तीन दिवसांपासून नवी मुंबईकरांच्या उदंड प्रतिसादामुळे गाजत असलेल्या या महोत्सवात आज शेवटच्या दिवशी खरेदीसाठी आणि विविध शासकीय सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे. दिनांक १ नोव्हेंबर रोजी सुरू झालेला हा चार दिवसीय महोत्सव आज रात्री १०:०० वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुला राहणार आहे. महिला उद्योजकांना आर्थिक बळ देण्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे अनेक उपक्रम या महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महोत्सवात स्थानिक नगरसेविका सलुजाताई सुतार यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या 'श्री. साई समर्थ ऑनलाईन ई-सेवा केंद्राला' नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आज शेवटचा दिवस असल्याने महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अवघ्या ₹१९९/- मध्ये मिळणारे NCMC S.T SMART CARD बनवून घेण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. याशिवाय आयुष्मान भारत कार्ड, आभा कार्ड, उत्पन्नाचे व रहिवासी दाखले, आणि सिडको-म्हाडा घरांच्या ऑनलाईन अर्जांची कामे करून घेण्यासाठी नागरिकांनी या केंद्रावर एकच गर्दी केली आहे.

टाईम्स स्पेशल

महानगरपालिकेच्या 'इटीसी' (etc) अपंग शिक्षण केंद्राच्या स्टॉलला भेट देऊन दिव्यांग मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी करण्यावर नागरिकांचा विशेष भर आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बनवलेल्या पणत्या, आकाशकंदील आणि हस्तकलेच्या वस्तूंना मोठी मागणी असून, आज शेवटच्या दिवशी उरलेला स्टॉक खरेदी करून या दिव्यांग बांधवांना आर्थिक हातभार लावण्याचे आवाहन केले जात आहे. महिला सक्षमीकरणाचा सुंदर संदेश देणारे सेल्फी पॉईंट्स, रुचकर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि खरेदीची ही अंतिम संधी असल्याने, आज संध्याकाळी नेरूळच्या प्रदर्शन मैदानावर नवी मुंबईकरांची विक्रमी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg