loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा तालुका खो-खो स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूलचा डंका; दोन्ही संघांचे अंतिम विजेतेपद!

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यातील वेरवली हायस्कूल येथे नुकत्याच पार पडलेल्या शालेय तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत लांजा येथील न्यू इंग्लिश स्कूल व तुकाराम पुंडलिक शेट्ये ज्युनिअर कॉलेजच्या मुलांच्या व मुलींच्या संघांनी अंतिम विजेतेपद पटकावत घवघवीत यश संपादन केले. दोन्ही संघांनी सलग २० वर्षे तालुक्यातील अव्वल स्थान कायम राखत खो-खो या क्रीडा प्रकारातील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेत दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळ, चपळता, जिद्द आणि सांघिक समन्वयाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. खेळाडूंच्या या यशामागे नियमित सराव, शिस्त आणि योग्य मार्गदर्शन यांचा मोलाचा वाटा आहे. महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक अनिल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी मिळविलेले हे यश विशेष उल्लेखनीय आहे. सलग दोन दशके तालुकास्तरावर अव्वल स्थान टिकवून ठेवणे ही महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेची आणि सातत्यपूर्ण कामगिरीची साक्ष आहे.

टाईम्स स्पेशल

या उल्लेखनीय यशाबद्दल दोन्ही संघांतील सर्व खेळाडू आणि क्रीडा शिक्षक अनिल कांबळे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या यशामुळे लांजा ज्युनिअर कॉलेजच्या नावलौकिकात भर पडली असून, विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात पुढील यश मिळविण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg