loader
Breaking News
Breaking News
Foto

मिशन रायझिंग फ्लावर्स अंतर्गत नूतन इंग्लिश स्कूल तिसंगी येथे विद्यार्थी सुरक्षितता व सायबर जनजागृती कार्यक्रम संपन्न

खेड (तिसंगी) : विद्यार्थ्यांसाठी सुरक्षितता, सजगता आणि स्वसंरक्षण या बाबींना प्राधान्य देत रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात मिशन रायझिंग फ्लावर्स हे अभियान राबवण्यात येत आहे. या मिशन अंतर्गत नूतन इंग्लिश स्कूल, तिसंगी येथे विद्यार्थी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खेड पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल आणि प्रशालेचे माजी विद्यार्थी संजय चिकणे, खेड पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल कोकतरे व पोलीस कॉन्स्टेबल पवार यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये प्रामुख्याने - सायबर गुन्हे व त्यापासून बचावाचे उपाय सोशल मीडियाचा सुरक्षित वापर विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी कायदेशीर मार्ग व हक्क सामाजिक स्तरावर असुरक्षित वाटल्यास करावयाच्या उपाययोजना या विषयांवर विद्यार्थ्यांना सजग करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक सत्यनारायण मिश्रा यांनी उपस्थित पोलीस मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशालेच्या शिक्षिका शिर्के यांनी केले. विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा मोठ्या उत्साहात लाभ घेतला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg