loader
Breaking News
Breaking News
Foto

पूर्ये तर्फे सावर्डे आणि शिरंबे गावात ग्रामपंचायत कार्यालय मध्ये दुष्काळ आढावा बैठक

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - चालू वर्षी कमी पडलेल्या पावसामुळे आतापासून पाणी कमी पडू लागले व पाणी आटल्याने जि.प.सदस्य सुशील भायजे यांनी आपल्या धामापूर तर्फे संगमेश्वर‌ या गटातील गावा..गावातून दुष्काळ आढावा सभा दौरा सुरू आल्या प्रमाणे पूर्ये तर्फे सावर्डे व शिरंबे ग्राम पंचायतीमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला सोबत पं.स.सदस्य महेश जड्यार, धामापूर प्रभाग समिती सचिव एम आर कांबळे, मंडल अधिकारी करंबेळे, कृषी अधिकारी दौंड, ग्रामविस्तार अधिकारी अभिजीत चव्हाण, होळकर, तलाठी ठोंबरे, पोलिस पाटील नयन दळवी, शिरंबे सरपंच चंद्रकांत वरवटकर, महेश पवार, दत्ताराम पवार, अंगणवाडी सेविका तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गावातील पाण्याची आजची परिस्थिती ज्या मानाने आहे.तर पुढे काय उपाय योजना केली पाहिजे यावर चर्चा, बंधारे बांधणे, गाळ काढणे, पाणी बचत यावर मार्गदर्शन करण्यात आले. पाण्याचे स्रोत वाढवणे जंगली प्राणी पक्षी यांना सुद्धा जंगलातील नैसर्गिक झरे मोकळे करून त्यांना पाण्याची व्यवस्था करावी, काही अडचणी असतील तर तात्काळ जि.प.सदस्य म्हणून माझ्याकडे संपर्क करून आपण सर्वांच्या सहकार्याने पाण्याच्या अडचणी सोडवूया, असे भायजे यांनी आवाहन केले. तसेच शेतीचे पंचनामे संबधितांनी तात्काळ करावे व ससमन्वयाने सामान्याना आधार मिळावा, यावर चर्चा करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg