संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कडवई जिल्हा परिषद गटात गावोगावी बैठका घेऊन दुष्काळी परिस्थितीचा आढावा आणि उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. “दुष्काळी काळात गावातील प्रत्येक नागरिकाला पुरेसा पाणीपुरवठा झाला पाहिजे. यासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून ‘पाणी हाच आपला पक्ष’ या भावनेतून सर्वांनी एकत्रित काम करावे,” असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य संतोष थेराडे यांनी केले. जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे, पंचायत समिती सदस्य सौ. अपर्णा जाधव आणि पंचायत समिती सदस्य दत्ताराम लाखन यांच्या वतीने संगमेश्वर तालुका जिल्हा परिषद गटातील विविध गावांना भेटी देऊन पाणीटंचाई आणि दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. कडवई, तुरळ, चिखली, गोळवली, राजवाडी, शेंबवणे, धामणी, शेनवडे, रांगव, तांबेडी, निवळी, नायरी, शृंगारपूर, कातूर्डी, अंत्रवली, कारभाटले, तिवरे आणि उमरे या गावांमध्ये ग्रामपंचायतींच्या माध्यमातून बैठका घेण्यात आल्या.
या बैठकांमध्ये गावातील पाण्याची उपलब्धता, संभाव्य पाणीटंचाई, पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती आणि आवश्यक दुरुस्ती याबाबत ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली. उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी आतापासूनच नियोजन करून आवश्यक उपाययोजना राबविण्याचे आवाहन करण्यात आले. गावातील नदी, ओढे आणि पऱ्यांमधील पाणी अडवून त्याचा साठा वाढविण्यासाठी वनराई बंधारे आणि विजय बंधारे उभारण्यावर विशेष भर देण्यात आला. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या जलस्रोतांचा योग्य वापर करून पाणी जमिनीत मुरविणे आणि भूजलपातळी वाढविणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बंधारे उभारण्यासाठी आवश्यक असलेले सहकार्य जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांच्या माध्यमातून केले जाईल, अशी ग्वाहीही देण्यात आली. प्रत्येक गावात आवश्यकते नुसार विहिरींची व्यवस्था करणे, जुन्या आणि बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करणे तसेच उपलब्ध जलस्रोतांचे योग्य नियोजन करण्यावर भर देण्यात आला.
दुष्काळी परिस्थितीत केवळ तात्पुरत्या उपाय योजनांवर अवलंबून न राहता गावनिहाय पाणीटंचाईचा आढावा घेऊन कायमस्वरूपी उपाययोजनांची आखणी करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत, महसूल विभाग, कृषी विभाग आणि पाणीपुरवठा यंत्रणेने समन्वयाने काम केल्यास संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करता येईल, अशी भूमिका या बैठकीत मांडण्यात आली. या गावभेट कार्यक्रमाला गावांचे सरपंच, प्रशासक, ग्रामसेवक, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी, तहसीलदार, कृषी अधिकारी, तलाठी तसेच विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते. गावागावांतील महिला आणि ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थ यांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास पाणीटंचाईवर प्रभावीपणे मात करता येईल, असा विश्वास या दौऱ्यात व्यक्त करण्यात आला.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.