loader
Breaking News
Breaking News
Foto

दिवाळी निमित्त रविवारी घेण्यात येणारा मेगा ब्लॉक रद्द करावा, नवी मुंबई काँग्रेसची मागणी

नवी मुंबई : दिवाळी निमित्त रविवारी घेण्यात येणारा मेगा ब्लॉक रद्द करावा, अशी मागणी नवी मुंबई काँग्रेसने केली आहे. नवी मुंबई रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेत त्यांनी आपल्या मागणीचे निवेदन सादर केले. सध्या दिवाळी सण सुरु असून रविवार दिनांक 08/11/2026 रोजी नरक चतुर्थी व लक्ष्मीपुजन हे सण असल्याकारणाने नागरिकांची खरेदीसाठी व पाहुणचारांसाठी मोठ्या संख्येने ये-जा सुरु असून नागरिक हे रेल्वेने प्रवास करतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या दिवशी नागरीकांची गैरसोय होऊ नये म्हणून रविवार दिनांक 08/11/2026 रोजी मेगा ब्लॉक रद्द करून नागरिकांना सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी आपल्याकडून अनोखी भेट उपलब्ध करून द्यावी अशी विनंती निवेदनाद्वारे नवी मुंबई काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी नवी मुंबई काँग्रेस ओबीसी सेलचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संतोष सुतार, युवा नेते धीरज लोखंडे, सचिन सुतार, सुरज शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg