loader
Breaking News
Breaking News
Foto

२ महाराष्ट्र नवल युनिट एनसीसीतर्फे रत्नागिरीत ऐतिहासिक ‘मेन्यू २७’ ओपन सी सेलिंग मोहीम यशस्वी; ६० कॅडेट्सचा २५० किमी सागरी प्रवास संपन्न

रत्नागिरी (जमीर खलफे): एनसीसी ग्रुप मुख्यालय कोल्हापूर आणि महाराष्ट्र डायरेक्टरेटच्या मार्गदर्शनाखाली २ महाराष्ट्र नवल युनिट एनसीसीतर्फे रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेली ऐतिहासिक ‘मोस्ट एंटरप्रायझिंग नवल युनिट’ (मेन्यू २७) ही ओपन सी सेलिंग मोहीम अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या संपन्न झाली आहे. कोकण किनारपट्टीवर पार पडलेल्या या खडतर मोहिमेदरम्यान ६० हून अधिक नवल कॅडेट्सनी २७ फूट लांबीच्या डीके व्हेलर्स बोटींद्वारे तब्बल २५० किलोमीटरचा सागरी प्रवास कोणताही अपघात न होता (झिरो-इन्सिडेंट) पूर्ण करत नौदल सामर्थ्याचे उत्कृष्ट दर्शन घडवले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मोहिमेची औपचारिक सुरुवात ६ ते १५ ऑक्टोबर २०२६ दरम्यान भाट्ये येथील एनसीसी बोट पूल येथे आयोजित प्री-मेन्यू कॅम्पने झाली होती, ज्यामध्ये १२० वरिष्ठ विभाग आणि वरिष्ठ विंग कॅडेट्सना सीमनशिप, बोट पुलिंग, रिगिंग तसेच किनारपट्टीवरील नेव्हिगेशनचे कडक प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यातून निवडण्यात आलेल्या ६० उत्कृष्ट कॅडेट्सनी २२ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान रत्नागिरी ते पालशेत आणि परतीचा खडतर प्रवास समुद्रातील उसळत्या लाटा, भरती-ओहोटीचे प्रवाह आणि बदलत्या वाऱ्यांचा सामना करत यशस्वीपणे पूर्ण केला. विशेष म्हणजे, केवळ सागरी मोहिमेपुरते मर्यादित न राहता कॅडेट्सनी ‘कोकण ज्ञान तरंग’ या संकल्पनेअंतर्गत मालगुंड, वरवडे, तवसाळ, वेळणेश्वर, गुहागर आणि जयगड या बंदरांवर पथनाट्यांद्वारे बेटी बचाओ-बेटी पढाओ, समुद्र संरक्षण, युवा सक्षमीकरण आणि संरक्षण क्षेत्रातील करिअर या विषयांवर जनजागृती करत सुमारे २,८०० नागरिकांशी थेट संवाद साधला.

टाईम्स स्पेशल

मोहिमेच्या सांगता समारंभास एनसीसी ग्रुप मुख्यालय कोल्हापूरचे डेप्युटी ग्रुप कमांडर कर्नल अनुप उपस्थित होते; त्यांनी मोकळ्या समुद्रातील आव्हानात्मक परिस्थितीत कॅडेट्सनी दाखवलेले नेतृत्व, शारीरिक चिकाटी आणि संघभावनेचे विशेष कौतुक करत सेलिंग टीम, प्रशिक्षक आणि कॉक्सवेन यांचा सत्कार केला. कमांडिंग ऑफिसर कमांडर रामानजुल दीक्षित यांनी भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल, नागरी प्रशासन, बंदर प्राधिकरण आणि स्थानिक शिक्षण संस्था यांच्यातील उत्तम समन्वयामुळेच हा २५० किलोमीटरचा सागरी प्रवास पूर्णतः सुरक्षित पार पडल्याचे नमूद केले. यानंतर औपचारिक फ्लॅग-इन सोहळा पार पडून स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली, तर ‘एकता आणि शिस्त’ या एनसीसीच्या ध्येयवाक्याच्या जयघोषाने या ऐतिहासिक मोहिमेची सांगता झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg