केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा तालुक्यातील वेरळ-अंजणारी येथील जीवघेणी वळणे आता प्रवाशांसाठी मृत्यूचे सापळे बनली आहेत. या भागात सतत होणार्या भीषण अपघातांमुळे हे क्षेत्र ’ब्लॅक स्पॉट’ (अपघात प्रवण क्षेत्र) म्हणून घोषित झाले आहे. यावर उपाय म्हणून आता प्रशासनाने खडबडून जागे होत या ठिकाणी तब्बल २१ कोटी रुपयांच्या उड्डाणपुलाचा सुधारीत प्रस्ताव घाईघाईने मंजुरीसाठी पाठवला आहे. मात्र, महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामावेळीच जर ही वळणे सरळ करून रस्ता काढला गेला असता, तर आज अनेक निष्पापांचे प्राण वाचले असते, असा संतप्त सूर स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमधून उमटत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे कोट्यवधी रुपये खर्चून चौपदरीकरण करण्यात आले. गेली पंधरावर्षे काम पुर्ण होण्यास लागली. चौपदरीकरणाच्या कामामध्ये वास्तविक पाहता, रस्ता रुंदीकरण करताना भविष्यातील धोके ओळखून लांजा तालुक्यातील आंजणारी, वेरळ, वाकेड ही धोकादायक वळणे काढून रस्ता सरळ करणे अपेक्षित होते. परंतु, तत्कालीन नियोजन शून्य कारभारामुळे ही वळणे तशीच राहिली.
आंजणारीच्या तीव्र उतारावर गेल्या दोन महीन्यात १२ अपघात झाले, काहींना आपला जीव गमवावा लागला, तर काही जखमी होण्याच्या घटना घडल्या. या घटना ताज्या असल्या तरी या आधी शेकडो अपघात आंजणारी घाटीत घडले आहेत. आंजणारी, आणि वेरळ येथील तीव्र उताराची वळणे ही सुरूवातीपासून धोकादायक असताना संबंधित प्रशासनाच्या अधिकार्यांना याची कल्पना नसावी, याचेच आश्चर्य प्रवाशी जनतेतून व्यक्त होत आहे. महामार्ग चकाचक झाला तरी या वळणांवर वाहनांचा वेग अनियंत्रित होऊन दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. अनेक कुटुंबांनी आपले कर्ते पुरुष या वळणावर गमावले आहेत. गेल्या बर्याच वर्षानंतर महामार्गाचे काम पुर्ण झाले. अपघाचे प्रमाण कमी होण्यासाठी आणि सुरळीत, सुखकर प्रवासासाठी महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. महामार्ग चकाचक झाला तरी या वळणावर दररोज अपघात घडत आहेत. या पार्श्वभूमीवर संबधित प्रशासनाकडून अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी रस्त्यावर गतिरोधक ही टाकण्यात आले. तरीही अपघाताचे प्रमाण कमी झाले नाही. दररोज अपघात घडत आहेत, अपघाताचे वाढते प्रमाण आणि वाढता लोकक्षोभ लक्षात घेता संबधित यंत्रणेला चांगलीच जाग आली आहे. आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित प्रशासकीय यंत्रणेने तातडीने पावले उचलली आहेत.
आंजणारी येथील अपघातांची मालिका रोखण्यासाठी २१ कोटी रुपये खर्चाच्या उड्डाणपुलाचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आला आहे. निष्पाप लोकांचे जीव गेल्यानंतर प्रशासनाने आता उड्डाणपुलाचा प्रस्ताव पाठवला आहे. हे आधीच का सुचले नाही.? असा सवाल स्थानिक जनतेतून केला जात असून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. चौपदरीकरणाचे काम सुरू असतानाच जर ही वळणे सरळ केली असती, तर आज २१ कोटींचा अतिरिक्त खर्च करण्याची वेळ आली नसती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकांचे अमूल्य प्राण वाचले असते. प्रशासकीय ढिसाळपणामुळे झालेल्या मानवनिर्मित चुकीची किंमत जनतेला आपल्या प्राणाने मोजावी लागली आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.