loader
Breaking News
Breaking News
Foto

पाचल येथील कै. ज्ञा. म. नारकर वाचनालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात; पाच दिवसीय ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

पाचल (तुषार पाचलकर): भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त राजापूर तालुक्यातील पाचल येथील कै. ज्ञा. म. नारकर वाचनालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला वाचनालयाचे अध्यक्ष किशोर ज्ञानदेव नारकर यांच्या हस्ते डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. वाचनालयाचे कार्यवाह विनायक खानविलकर यांनी उपस्थितांचे स्वागत करत वाचन संस्कृतीचे महत्त्व आणि वाचन प्रेरणा दिनाची पार्श्वभूमी विशद केली. तसेच या दिनाचे औचित्य साधून नारकर वाचनालयात सलग पाच दिवसांचे विशेष ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आल्याचे जाहीर करत, पाचल व परिसरातील विद्यार्थी, वाचक, अभ्यासक आणि सभासदांनी या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रेरणादायी कार्यक्रमास वाचनालयाचे उपाध्यक्ष राजन लब्दे, खजिनदार शिरीष सक्रे, लिपिक काव्या सुतार यांच्यासह पाचल ग्रामपंचायत सदस्य नफिस बोबडे, ग्रामपंचायत लिपिक कल्पेश सुतार, राधा सुतार, मंडळ अधिकारी एस. टी. पवार, एस. एस. नरके, तलाठी एस. एस. कांबळे, तलाठी आशिष अस्वले, प्रकाश सावंत, आरसिन गडकरी, वैष्णवी खानविलकर यांच्यासह परिसरातील वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. शेवटी वाचनालयाचे ग्रंथपाल विठोबा चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg