मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड तालुक्यातील देव्हारे पंचक्रोशी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हा क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन करत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. इयत्ता नववीतील वैष्णवी येळकर हिने थाळीफेक क्रीडा प्रकारात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला, तर इयत्ता आठवीतील अर्णव चोरगे याने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. या दोन्ही गुणवंत खेळाडूंची विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाचे कौतुक करण्यासाठी सेवा संकल्प अभियानांतर्गत विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
यावेळी पालवणी ग्राम महसूल अधिकारी रतन साळुंखे यांच्या हस्ते वैष्णवी येळकर हिचा, तर भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते अर्णव चोरगे याचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना पालवणी ग्राम महसूल अधिकारी रतन साळुंखे म्हणाल्या, “खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, जिद्द आणि संघभावना निर्माण होते. वैष्णवी येळकर आणि अर्णव चोरगे यांनी जिल्हा क्रीडा स्पर्धेत मिळविलेले यश हे त्यांच्या मेहनतीचे, सातत्यपूर्ण सरावाचे आणि योग्य मार्गदर्शनाचे फलित आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही उत्तम क्रीडागुण असून, त्यांना योग्य संधी व प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांनी विभागीय स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करून आपल्या शाळेचे, गावाचे आणि तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे.
भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा क्षेत्रात मोठी क्षमता आहे. या क्षमतेला योग्य व्यासपीठ, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यास विद्यार्थी जिल्हा, विभागीय, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरही आपली गुणवत्ता सिद्ध करू शकतात. वैष्णवी येळकर हिने थाळीफेकमध्ये प्रथम क्रमांक, तर अर्णव चोरगे याने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून इतर विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. या दोन्ही खेळाडूंनी आगामी विभागीय स्पर्धेतही यश संपादन करावे, यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या यशाचा सन्मान करणे हीच सेवा संकल्प अभियानाची प्रेरणा आहे.” या कार्यक्रमाला देव्हारे ग्राम महसूल अधिकारी अमोल पाटील, उन्हवरे ग्राम महसूल अधिकारी नयन बोबडे, देव्हारे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक योगेश कुमार केसरे, महसूल सेवक सुनीत गमरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.