कोर्लई,ता.१०(राजीव नेवासेकर) जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील आयुष हॉस्पिटल, रायगड इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन (RINE) आणि नूतन स्कूल ऑफ नर्सिंग (NSN) यांच्या संयुक्त विद्यमाने मानसिक आरोग्याविषयी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येऊन जनजागृती करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढून, पथनाट्य सादर करून समाजाला मानसिक आरोग्याचे महत्त्व पटवून दिले.
मानसिक आरोग्याविषयी समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे, मानसिक आरोग्याशी संबंधित गैरसमज व कलंक दूर करणे आणि प्रत्येक व्यक्तीने आपल्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणे आवश्यक आहे, हा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला.नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅलीद्वारे मानसिक आरोग्याचे महत्त्व,स्वास्थ्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन आणि गरज भासल्यास योग्य मदत घेण्याचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवून पथनाट्य सादर केले. या पथनाट्यातून आनंदी, निरोगी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी मानसिक आरोग्य किती महत्त्वाचे आहे, हे प्रभावीपणे मांडण्यात आले तसेच मानसिक तणाव किंवा भावनिक अडचणींचा सामना करणाऱ्या व्यक्तींना समजून घेणे,त्यांना सहकार्य करणे आणि त्यांच्याशी संवेदनशीलतेने वागणे आवश्यक असल्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी अकॅडमिक डायरेक्टर तथा प्राध्यापक आणि प्राचार्य डॉ.सुधादेवी सदानंद यांनी मानसिक आरोग्याचे प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. मानसिक स्वास्थ्यामुळे भावनिक संतुलन राखण्यास, दैनंदिन आव्हानांचा सामना करण्यास, नातेसंबंध दृढ करण्यास आणि आनंदी व उत्पादक जीवन जगण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसह समाजातील प्रत्येक घटकाने मानसिक आरोग्याविषयी जागरूक राहणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. आयुष हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. अनिल गोस्वामी यांनी रुग्णसेवेबाबत हॉस्पिटलची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, आयुष हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर केवळ वैद्यकीय तपासणी व उपचार केले जात नाहीत, तर त्यांना मानसिकदृष्ट्याही निरोगी राहण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले जाते. शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्यही महत्त्वाचे असून सर्वांगीण स्वास्थ्यासाठी या दोन्हींची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्य हे सर्वांगीण आरोग्याचा महत्त्वाचा आधार असल्याचे सांगितले.आयुष हॉस्पिटल, RINE आणि NSN यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमातून आरोग्यविषयक जनजागृतीमध्ये नर्सिंग विद्यार्थ्यांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित झाली. विद्यार्थ्यांनी समाजापर्यंत मानसिक आरोग्याचा संदेश पोहोचवून संवेदनशील, जागरूक आणि निरोगी समाज घडविण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलले.मानसिक आरोग्याची काळजी घ्या, गरज पडल्यास मदत मागा आणि आनंदी व निरोगी जीवनासाठी मानसिक स्वास्थ्याला प्राधान्य द्या.संदेश देण्यात आला.



































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.