loader
Breaking News
Breaking News
Foto

‘ओंकार’ हत्ती थेट घरापर्यंत; मडुर्‍यात घरात घुसण्याचा प्रयत्न, गावात भीतीचे वातावरण

बांदा : (प्रतिनिधी) - शेतात धुमाकूळ घालणार्‍या ’ओंकार’ हत्तीचे संकट आता थेट घरापर्यंत पोहोचले आहे. बुधवारी रात्री सव्वा सातच्या सुमारास ओंकार हत्ती चक्क मडुरा येथील बाबू शिरोडकर यांच्या घराच्या अंगणात घुसला आणि घरात घुसण्याचा प्रयत्न केला. अचानक अंगणात हत्ती आल्याने घरातील सदस्यांची एकच तारांबळ उडाली. काहीवेळ घरात भीतीचे वातावरण पसरले होते. आरडाओरड झाल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली. वनविभागाचे कर्मचारी वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने हत्तीला पुन्हा जंगलाच्या दिशेने पिटाळून लावण्यात यश आले. गेल्या काही दिवसांपासून ओंकार हत्ती बांदा, कास, मडुरा परिसरात ठाण मांडून आहे. आतापर्यंत शेतपिकांचे नुकसान करणारा ओंकार आता थेट मानवी वस्तीत, घरापर्यंत येऊ लागल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. जखमी असल्याने हा हत्ती अधिक आक्रमक झाल्याची चर्चा असून, वनविभागाने तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी मडुरा ग्रामस्थांमधून होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg