loader
Breaking News
Breaking News
Foto

माजी विद्यार्थी पांडुरंग भोसले यांच्याकडून बिजघर नं १ शाळेला प्रिंटर भेट

खेड : बिजघर नंबर एक शाळेचे सर्वात जुने विद्यार्थी पांडुरंग महादेवराव भोसले यांच्याकडून मिशन आपुलकी अंतर्गत बिजघर नं.१ शाळेला प्रिंटर प्रदान करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक रमेशराव भोसले यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी बोलताना शिवपार्वती उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष विजय पांडुरंग भोसले यांनी आपले वडील पांडुरंग महादेव भोसले हे या शाळेचे प्रथम विद्यार्थी असून या शाळेसाठी काहीतरी करावे अशी त्यांची प्रबळ इच्छा होती, असे सांगत यानंतर देखील शाळेला जी जी मदत लागेल ती करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रम प्रसंगी बोलताना शिवपार्वती उत्कर्ष मंडळाचे सचिव रमेशराव भोसले यांनी काही वर्षांपूर्वी शाळेचा पट सतरा होता आता शाळेचा पट 32 आहे. सर्व शिक्षकांनी शाळेत राबवलेल्या विविध उपक्रमामुळेच विद्यार्थी शाळेकडे आकृष्ट होत असून त्यामुळेच शाळेचा पट वाढला आहे, असे सांगत शिक्षकांच्या कामाचे कौतुक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी पांडुरंग महादेवराव भोसले, माजी सरपंच शुभांगी भोसले, रमेशराव दिनकरराव भोसले, सेवानिवृत्त कॅप्टन राजारामराव भोसले, विजयराव भोसले, गावचे मानकरी सुनीलराव भोसले, हा व्यवस्थापन समिती अध्यक्षा आकांक्षा जंगम, माजी अध्यक्ष भगवान जंगम, अजय भोसले, सामाजिक कार्यकर्ते राम भोसले, व्यावसायिक कमलेश भोसले, सदानंद चव्हाण, अशोक निकम, सुप्रिया चव्हाण, सुप्रिया भोसले, प्रेमा भोसले, जयश्री निकम आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितयांचे शाळेच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर यांनी स्वागत केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश पराडकर यांनी केले, तर संदीप घाणेकर यांनी आभार मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg