रत्नागिरी - रत्नागिरीतील फिशमिल कंपनी मालकांची काही दिवसांपूर्वी खा. नारायण राणे यांनी शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे बैठक घेऊन छोट्या मच्छिमारांना वाजवी दर देण्यात यावा, असे सांगितले. तसेच दर निश्चित करताना भाजपाचे राज्य अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष अब्दुल बिजली खान यांच्याशी सल्ला मसलत करण्यात यावे, असेही सांगितले. परंतु अद्यापही याबाबत कार्यवाही न झाल्याने मच्छिमारांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. खा. नारायण राणे मागील आठवड्यात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी रत्नागिरीत आले असता त्यांनी शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे फिशमिल चालकांची बैठक घेतली होती.
खा. नारायण राणे यांनी यावेळी आग्रहाने सांगितले की मच्छिमारांना वाजवी भाव मिळाला पाहिजे. याबाबत भाजपाचे राज्य अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष व मच्छिमार नेते अब्दुल बिजली खान यांच्याशी चर्चा करुन त्वरेने दर निश्चित करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले. परंतु एक आठवडा लोटला तरी याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने मच्छिमारांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. यावर्षी दि. १ सप्टें. पासून मच्छिमारी सुरु झाली. उत्तम दर्जाची मासळी कमी प्रमाणात मिळत असली तरी फिशमिल कंपन्यांसाठी लागणारी मच्छि बर्यापैकी मिळत होती. त्यामुळे दुधाची तहान ताकावर भागवावी अशा पध्दतीने मच्छिमार कसेबसे खर्च भागवित होते. सुरुवातीला ३२ किलोच्या एका टब मासळीचा दर रु. १८०० इतका दिला जात असे, त्यामुळे मच्छिमारांचा खर्च काही प्रमाणात भरुन निघत असे.
परंतु अचानक हा दर रु. ११०० पर्यंत खाली आणण्यात आला. यावर अब्दुल बिजली खान यांनी खा. नारायण राणे व मच्छि व्यवसाय मंत्री ना. नितेश राणे यांच्याकडे तक्रार करुन मच्छिमारांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली. त्यानुसार खा. नारायण राणे यांनी रत्नागिरीत फिश मिल कंपन्यांची बैठक आयोजित केली होती व अब्दुल बिजली खान यांच्याशी चर्चा करुन याबाबत निर्णय घेण्यात यावा, असा आदेश देण्यात आला होता. मुंबई व रायगड जिल्ह्यातील तसेच कर्नाटकातील फिश मिल कंपन्या रत्नागिरी परिसरातील फिशमिल कंपन्यांपेक्षा एका टन मच्छिमागे सुमारे रु २०० ते २५० इतका दर अधिक देतात. मग रत्नागिरीतील मच्छिमारांवर अन्याय का? असा खडा सवाल अब्दुल बिजली खान यांनी उपस्थित केला आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.