loader
Breaking News
Breaking News
Foto

जानवळे गावचे सुपुत्र ह.भ.प. संतोष दळवी महाराज यांचा शरदरत्न पुरस्काराने गौरव

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील जानवळे गावचे सुपुत्र वैकुंठवासी ह. भ. प. रामचंद्र महाराज दळवी यांचे चिरंजीव व कीर्तनकार ह. भ. प. संतोष महाराज रामचंद्र दळवी यांना शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य)च्या वतीने विशेष कीर्तनकार सन्मान शरद रत्न पुरस्कारशरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष भजन सम्राट राजाराम बुवा शेलार यांच्या संकल्पनेतून ह. भ. प. अंकुश महाराज कुमठेकर यांच्या नेतृत्वाखाली माननीय ज्येष्ठ नेते, खासदार शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थापक अध्यक्ष राजाराम बुवा शेलार यांच्या हस्ते मुंबई दादर येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कीर्तनकार ह. भ. प. संतोष महाराज रामचंद्र दळवी हे वारकरी संप्रदायाचे पाईक असुन वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी पवित्र तुळशीची माळ गुरुवर्य वैकुंठवासी ह. भ. प. आत्माराम बाबा सोलकर यांच्या हस्ते घेतली आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याचा ध्यास घेतला. वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली त्यानंतर निरपेक्ष किर्तन सेवा संस्था मुंबई उपनगर जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती झाली. संप्रदायामध्ये गायन, वादन, किर्तन सेवा करुन सांप्रदायाचे व गावचे नाव मोठे करत आहेत.

टाईम्स स्पेशल

महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, उद्योग, समाजसेवा तसेच विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाने उल्लेखनीय योगदान देत समाजाच्या प्रगतीत मोलाची भर घालणार्‍या व्यक्तींच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या योगदानाची दखल घेतली जावी आणि त्यांच्या कार्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त या वर्षी पासून विशेष कीर्तनकार सन्मान- २०२६ प्रदान करण्यात आला. किर्तन क्षेत्रात सातत्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आणि समाजासाठी दिलेल्या प्रेरणादायी योगदानाबद्दल हा सन्मान प्रदान आला असल्याचे शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान, (महाराष्ट्र राज्य) चे संस्थापक भजनसम्राट कोयनारत्न ह.भ.प राजाराम बुवा शेलार यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg