loader
Breaking News
Breaking News
Foto

तब्बल २० वर्षांनंतर श्रमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - तब्बल वीस वर्षांनंतर एकत्र आलेल्या जोगेश्वरी येथील श्रमिक विद्यालयाच्या २००६ च्या माजी विद्यार्थी बॅचचा स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या मेळाव्याला १५० हून अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते. जुन्या आठवणी, शिक्षकांप्रती कृतज्ञता आणि मैत्रीच्या नात्याचा अनोखा संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात स्व. यशवंतराव चव्हाण सरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच सरस्वती पूजनाने करण्यात आली. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात वृक्षारोपणही केले. दोन दशकांनंतर एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींनी शाळेतील रम्य दिवस, शिक्षकांचे मार्गदर्शन, वर्गातील गमतीजमती आणि बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. अनेक वर्षांनी भेटलेल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संवादामुळे वातावरण भावूक झाले होते. शाळेच्या संस्कारांशी आणि जुन्या मैत्रीच्या नात्याशी पुन्हा जोडणारा हा सोहळा सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून संचालिका स्मिताजी चव्हाण, मुख्याध्यापिका मीनल सरकाळे, उपमुख्याध्यापक विजय ठाकूर,पर्यवेक्षक संदीप फणसेकर यांच्यासह आजी-माजी शिक्षक उपस्थित होते. शाळा आणि माजी विद्यार्थ्यांमधील महत्त्वाचा दुवा ठरलेले माजी पर्यवेक्षक शाहू शिर्के यांचे या मेळाव्याच्या आयोजनात विशेष योगदान लाभले. २००६ च्या बॅचमधील १५० हून अधिक माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी अंकुश सुतार, दीपेश राऊळ, पूजा हाटले, निखिल सावंत, अमोल देसाई, विश्वास मसुरकर आणि अजित सावंत यांनी पार पाडली. सुनील शिंदे, महालक्ष्मी दळवी आणि वैभव नवघरे यांनी सूत्रसंचालन करून कार्यक्रमात रंगत आणली. तसेच निवृत्ती झिम्बरे यांचे सहकारी माजी सैनिक संदीप पांचाळ यांनी आपल्या मनोरंजनात्मक सादरीकरणातून उपस्थितांचे मनोरंजन केले.

टाईम्स स्पेशल

या मेळाव्यात शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र छायाचित्रे काढून जुन्या आठवणी जपल्या. शाळेतील मधल्या सुट्टीत मित्रांसोबत एकत्र बसून जेवण्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी रात्री सर्वांनी एकत्र भोजनाचा आनंद घेतला. गप्पा, हास्यविनोद आणि आठवणींच्या साथीने या स्नेहमेळाव्याची सांगता झाली. वीस वर्षांनंतर पुन्हा एकदा शाळेच्या आठवणींच्या विश्वात रमण्याची संधी मिळाल्याने उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. हा स्नेहमेळावा केवळ पुनर्भेट न ठरता मैत्री, कृतज्ञता आणि शालेय संस्कारांचा ऋणानुबंध अधिक दृढ करणारा ठरला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg