loader
Breaking News
Breaking News
Foto

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून देवगड Y जंक्शनचे होणार सुशोभीकरण

देवगड (प्रतिनिधी) - देवगड शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या Y जंक्शनच्या सुधारणा व सुशोभीकरणासाठी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. देवगड एसटी बसस्थानकाच्या कोपऱ्याची शासनाच्या ताब्यात असलेली जागा उपलब्ध करून या ठिकाणी आकर्षक सर्कल उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी विविध संस्था, संघटना आणि व्यापारी संस्थांकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या मागणीची दखल घेत हा निधी उपलब्ध करून दिला आहे. हा निधी सिंधू रत्न योजनेच्या माध्यमातून देण्यात आला असून, सर्कलच्या निर्मितीमुळे या परिसराचे स्वरूप बदलण्यासोबतच वाहतुकीच्या दृष्टीनेही सुविधा निर्माण होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

देवगड-निपाणी रस्त्याच्या विकासाचे काम सुरू असताना Y जंक्शनचे सुशोभीकरण होणे महत्त्वाचे मानले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी सर्कल उभारण्याची मागणी विविध संस्था, संघटना आणि व्यापारी वर्गाकडून करण्यात येत होती. या मागणीची पूर्तता झाल्याने परिसरातील नागरिकांची अनेक दिवसांची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. Y जंक्शनमधून जाणारा एक प्रमुख मार्ग देवगड-निपाणी रस्त्याला जोडतो, तर दुसरा महत्त्वाचा मार्ग कुणकेश्वरच्या दिशेने जातो. याच मार्गावर देवगडची पवनचक्की आणि पवनचक्की गार्डन असल्याने या मार्गावर पर्यटकांचीही मोठी वर्दळ असते. त्यामुळे या महत्त्वाच्या ठिकाणी सुसज्ज आणि सुशोभित सर्कलची आवश्यकता होती.

टाईम्स स्पेशल

प्रस्तावित सर्कलमध्ये देवगडची वैशिष्ट्यपूर्ण ओळख सांगणारा स्टॅच्यू उभारण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेसोबतच या सर्कलला पर्यटन आणि सौंदर्यीकरणाच्या दृष्टीनेही विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. देवगडमध्ये किल्ला, समुद्रकिनारा, पवनचक्की आणि पवनचक्की गार्डन यांसारखी पर्यटनस्थळे असून, Y जंक्शन हे या पर्यटन मार्गावरील महत्त्वाचे प्रवेशद्वार ठरते. त्यामुळे या ठिकाणी होणारे सुशोभीकरण देवगड शहराच्या सौंदर्यात भर घालणार आहे. या विकासकामामुळे देवगड शहरातील महत्त्वाच्या चौकाचे रूप पालटणार असून, नागरिक तसेच व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg