मालवण (प्रतिनिधी) - मालवण तालुक्यातील कट्टा- पेंडूर- पराड - काळसे हुबळीचा माळ हा या रस्त्याची अत्यंत दयानीय अवस्था झाल्याने हा संपूर्ण रस्ता नव्याने व दर्जेदार पद्धतीने तयार करावा, या मागणीसाठी पेंडूर गावच्या सर्वपक्षीय ग्रामस्थांनी पूर्व इशाऱ्यानुसार आज पेंडूर नाका येथे रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात शेकडो ग्रामस्थांनी सहभाग घेऊन रस्ता सुरळीत करावा अशी आग्रही मागणी लावून धरली. कट्टा- पेंडूर ते काळसे–हुबळीचामाळ या रस्त्याची गेल्या तीन वर्षांत झालेली अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधूनही रस्त्याच्या कामाबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या रस्त्यासाठी पेंडूर ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.
पेंडूर गावचे ग्रामदैवत श्री देव वेताळ मंदिरात भरविण्यात येणारा आणि १४ दिवस चालणारा प्रसिद्ध मांड उत्सव येत्या जानेवारी महिन्यात होऊ घातला आहे. हा उत्सव सुरू होण्यापूर्वी कट्टा पेंडूर पराड काळसे हुबळीचा माळ हा संपूर्ण रस्ता नव्याने व दर्जेदार पद्धतीने करावा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समस्त पेंडूर गाववासीय दिला होता. या इशाऱ्यानुसार पेंडूर व आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र येत रस्त्यावर ठिय्या आंदोलन छेडले. या आंदोलनास सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांनी भेट दिली. या ठिय्या आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजित पाटील व सहाय्यक अभियंता सूरज गिरी यांनी भेट देऊन आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. सदर रस्त्याचे बांधकाम होऊन अवघी तीन वर्षे झाली असताना रस्त्याची झालेली दुरवस्था ही अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. रस्त्यावरील खड्डे, उखडलेले डांबरीकरण आणि खराब झालेली अवस्था यामुळे वाहनचालक, विद्यार्थी, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना अपघाताचा धोका निर्माण झाला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे संपूर्ण रस्त्याचे नव्याने दर्जेदार व टिकाऊ बांधकाम तातडीने करण्यात यावे, अशी ठाम मागणी बांधकाम विभागच्या अधिकारी यांच्याकडे करण्यात आली.
आता केवळ आश्वासन नको, प्रत्यक्ष काम हवे अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेत प्रशासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने ठोस कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली. याची गांभीर्याने दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजित पाटील यांनी ५ किलोमीटर मंजूर असलेला रस्ता मांड जत्रोत्सवापूर्वी करून देण्याचे मान्य केले व उर्वरित रस्त्याच्या आराखडा नव्याने तयार करून मार्च २०२७ पर्यंत पूर्ण रस्त्याचे काम करून देऊ असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर हे ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले.







9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)



















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.