loader
Breaking News
Breaking News
Foto

शास्त्री, महात्मा गांधी जयंतीनिमित्त जी.जी.पी.एस.मध्ये स्वच्छता अभियान

रत्नागिरी, (जमीर खलफे) : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या जी.जी.पी.एस. शाळेमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूरशास्त्री जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबवण्यात आले. इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी वर्ग खोल्या व शालेय परिसर स्वच्छ करण्यात आला. या वेळी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अपूर्वा मूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ओवी बंडबे यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली, श्रावणी फडके यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याची माहिती दिली. सूत्रसंचालन नेत्रा केळकर यांनी केले. मुख्याध्यापिका सौ. अपूर्वा मूरकर यांनी परिसराच्या स्वच्छतेबरोबरच शरीराची व मनाची स्वच्छता किती महत्त्वाची आहे, हे त्यांनी पटवून दिले व पाणी बचतीचे आवाहन केले. संस्थेच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, सचिव सतीश शेवडे, शाळा समिती अध्यक्ष मंदार गाडगीळ, प्राथमिक शाळा समिती अध्यक्ष सुहास पटवर्धन, गुरुकुल विभागाच्या शाळा समिती अध्यक्ष प्राची जोशी यांनी या स्वच्छता मोहिमेचे विशेष कौतुक केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg