loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर दुचाकीचा अपघात; दोन जण जखमी

दापोली (चंद्रशेखर जोशी) : दापोली हर्णे मार्गवरील गिम्हवणे येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर रात्री दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली असून या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी डेरवण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोली पोलीस ठाण्यात रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास या अपघाताची माहिती मिळाल्यावर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर अपघात झाल्याचे निदर्शनास आले. या अपघातात एमएच.०८.जे.२९५२ क्रमांकाची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल अपघातग्रस्त झाली होती व दुचाकीवरील दुर्वांग राजेंद्र यादव (रा. गिम्हवणे) व संकेत देवळेकर (रा. खेड) असे दोन जण रस्त्याच्या बाजूला जखमी अवस्थेत पडलेले आढळून आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिसांनी त्यांच्या वाहनाने या दोघांना उपचारासाठी प्रथम दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दापोलीकडे येत असताना दुचाकीस्वराचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व दुचाकी पेट्रोल पंपासमोरील मारुती मंदिरासमोरील कठड्यालगत असलेल्या लोखंडी अँगलवर आदळल्याने हा अपघात झाल्याचे दापोली पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीमध्ये नमूद करण्यात आले आहे. याप्रकारणी अधिक तपास हेड कॉनस्टेबल बुरोंडकर करीत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg