loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये घरफोडी; 6 लाख ४० हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास, आंबडस-खोतवाडी येथे अज्ञात चोरट्यांचा घरात प्रवेश

खेड (दिलीप देवळेकर) - खेड तालुक्यातील आंबडस खोतवाडी येथे घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. १३ नोव्हेंबरच्या रात्री ७ वाजल्यापासून २० नोव्हेंबर रोजी दुपारी १२.४५ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे लॉक व कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरूममधील लाकडी कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेण्यात आली. या प्रकरणी अशोक रघुनाथ जाधव (वय ५८, व्यवसाय नोकरी, रा. आंबडस खोतवाडी, ता. खेड) यांनी तक्रार दाखल केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चोरीस गेलेल्या मालामध्ये सोन्याचा लक्ष्मीहार, सोन्याचे नेकलेस, पिळ्याची चेन, कर्णफुले, कानपट्टी, अंगठ्या, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम यांचा समावेश आहे. पोलिसांच्या अहवालानुसार चोरीस गेलेल्या मालाची एकूण किंमत ६ लाख ४० हजार रुपये आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६०/२०२६ नोंदविण्यात आला असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg