loader
Breaking News
Breaking News
Foto

देवलीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ; पोलिसांनी कारवाई करण्याची ग्रामपंचायतीची मागणी

मालवण (प्रतिनिधी) - देवली ग्रामपंचायत हद्दीत गणेशोत्सवाच्या कालावधीत दोन घरफोडीच्या घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांची सखोल चौकशी करून घरफोडी करणाऱ्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी देवली ग्रामपंचायतीतर्फे मालवण पोलिसांकडे करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक शेलार यांना निवेदन देण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीतील अवधूत सदाशिव चव्हाण तसेच आशा दिनानाथ धुरी आदींच्या घरात गणेशोत्सवाच्या कालावधीत घरफोडी करण्यात आली. त्यामुळे गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांना आळा बसावा, असे देवलीचे सरपंच शाम वाक्कर यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

यावर उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक शेलार यांनी आरोपींना जेरबंद करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी सरपंच शाम वाक्कर, रुपेश आळवे, गुरुप्रसाद चव्हाण, शिवदास चव्हाण, विजय चव्हाण, समीर वेतुरेकर, रामू चव्हाण उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg