loader
Breaking News
Breaking News
Foto

शेजारील तालुके दुष्काळग्रस्त, लांजा तालुक्यावर अन्याय का? शेतक-याचा संतप्त सवाल

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - शासनाने नुकतीच जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली असून, यामध्ये शेजारील संगमेश्वर, राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, भौगोलिकदृष्ट्या अगदी मध्यभागी असलेल्या लांजा तालुक्याला यातून वगळल्यामुळे स्थानिक शेतकर्‍यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेजारील तालुक्यांप्रमाणेच लांजामध्येही यंदा शेतीचे अतोनात नुकसान झाले असताना, शासनाने लांजा तालुक्यावरच हा अन्याय का केला, असा संतप्त सवाल आता शेतकरी वर्गातुन विचारला जात आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतक-यांना चांगलाच बसला आहे. पावसाने पाठ फीरवल्यामुळे गर्भात आलेली भातशेती वाया जाण्याची भिती शेतकर्‍यांमधून व्यक्त केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हवामान आणि पावसाच्या लहरीपणामुळे लांजा तालुक्यातील भातशेतीसह इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक भागांत पिके करपून गेली असून, शेतकर्‍यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार आहे. तालुक्यातील शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असतानाही, प्रशासकीय निकषांच्या नावाखाली लांजाला दुष्काळी सवलतींपासून दूर ठेवण्यात आले असल्यामुळे तालुक्यातील शेतक-यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर हे तिन्ही तालुके लांजा तालुक्याला लागून आहेत. हवामान आणि पावसाची परिस्थिती या सर्व तालुक्यांमध्ये सारखीच असताना शेजारील तीन तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर होतो आणि लांजा तालुका मात्र कागदोपत्री ’सुजलाम सुफलाम’ दाखवला जातो, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

टाईम्स स्पेशल

शासनाच्या या दुजाभावामुळे लांजातील शेतकरी शासकीय मदत, कर्जमाफी आणि इतर दुष्काळी सवलतींपासून वंचित राहणार असल्याने लांजाला का डावलले? असा संतप्त सवाल शेतकर्‍यांमधून केला जात आहे. लांजा तालुक्यातील वस्तुस्थितीची पाहणी न करता केवळ एका ठीकाणी बसून कागदोपत्री अहवाल तयार केले गेले आहेत, असा आरोप स्थानिक शेतकर्‍यांनी केला आहे. तालुक्यातील शेतीचे झालेले नुकसान डोळ्याना दिसणारे आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ या निर्णयाचा पुनर्विचार करावा, लांजा तालुक्यात पुन्हा एकदा शेतीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत आणि लांजालाही दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकर्‍यांना तात्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा, येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तालुक्यातील शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg